बँका सलग चार दिवस बंद - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 17 मार्च 2018

बँका सलग चार दिवस बंद

बँका सलग चार दिवस बंद

शे.कलिम.
यंदाच्या मार्च अखेरीस सलग चार सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे जर महत्त्वाची बँकेची कामं करायची असतील तर मार्च अखेरीची वाट पाहून नका. कारण यंदा 29 मार्च ते 1 एप्रिल अशा सलग चार सुट्ट्या आल्या आहेत.

29 मार्च रोजी महावीर जयंती, 30 मार्च रोजी गुड फ्रायडे, 31 मार्च रोजी बँकांची वर्षअखेर आणि 1 एप्रिल रोजी रविवार अशा या चार सुट्ट्या असणार आहेत. या चार दिवसांमध्ये बँकांचे दैनंदिन व्यवहार बंद असणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना बँकेचे व्यवहार करणे शक्य होणार नाही. या काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून बँकांनी आधीच ग्राहकांना मेसेज पाठवून सूचना दिल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें