मानवत येथील शेतकऱ्यांची ५८ किविटल कापुस चोरीस!
गजबजलेल्या परिसरात चोरी झाल्याने आश्चर्य
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.२४: मानवत शहरातील नेहमी गजबज असलेल्या पेठमोहल्ला परिसरातील शेतकऱ्यांच्या घरातुन ५८ किविटल कापुस चोरी गेल्याची खळबळजनक करणारी घटना घडली असुन या बाबत मानवत पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या विषयी प्राप्त माहितीनुसार अ .रशीद म. ईस्माइल बागवान धंदा शेतकरी वय ६२ रा.गुलशन नगर पाथरी यांनी पोलीसांना दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की त्यांची शेती मानवत तालुक्यात असुन ५८ किविटल कापुस त्यांनी वेचुन त्यांचे मामा रा.पेठमोहल्ला नामे अ.शिकुर अ.छटुजी यांच्या घरातील दोन खोल्यात कापुस ठेवला होता यात २२ फेब्रुवारी २०१८ते २४ मार्च २०१८ दरम्यान ५८ किविटल कापुस चोरीस गेला आहे या खोल्यात कापूस ठेवुन दाराला बाहेरुन कुलुप लावले होते माञ चोरट्यानी अतिशय चालाखीने कुलुप तोडुन कापुस चोरुन नेला आहे या परिसरात नेहमी नागरीकांची रहदारी असलेला रस्ता असल्याने चोरट्यानी कापुस चोरुन नेलाच कसा ते देखील कोणास माहिती न होता.या बाबत बातमी लिहिपर्यत एफ आय आर दाखल झाला नव्हता या बाबत आधिक चौकशी बीट जमादार आशीष कवठेकर करीत आहेत.या चोरीचे घटनेने शेतकरी अ .रशीद म. ईस्माइल बागवान हे पुर्ण कापसाचा पिकच चोरिला गेल्याने नैराश झाले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें