ज्ञानदीप विद्यालय शिक्षकनगर सिल्लोड येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा
सिल्लोड प्रतिनिधि (दि.08)ज्ञानदीप विद्यालय शिक्षकनगर सिल्लोड येथे जागतिक महिला दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आले. विद्यालयात यावेळी विद्यार्थ्यांनी महिला दिना निमित भाषने केली. विद्यालयात महिला दिना निमित महिला विषयी विद्यार्थी भाषने देत होती.यावेळी विद्यालयाच्या परिसरातच ग्रामिण भागामधुन केरकचरा जमा करण्यासाठी आलेल्या श्रीमती सुमनबाई चव्हाण हे या मुलांचे भाषणे खुप काळजी पुर्वक ऐकत उभ्या होत्या.सुमनबाई चव्हाण यांच्याकडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिक श्रीमती वंदना दिवेकर यांची नजर पडली व त्यांनी त्या महिलेला बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रकारामुळे गोंधळलेल्या सुमनबाईला सांगण्यात आले की आज जागतिक महिला दिन आहेत.सुमनबाई म्हणाल्या तेच मी ऐकत उभी होते, की महिलादिन ही असतो,जेव्हा त्यांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तेव्हा त्यांच्या डोळया मधुन आनंद आश्रु निघाले.घरची परिस्थीती हालाकीची असल्याने घराचा गाडा हकलण्यासाठी मला केर कचरा उचलावा लागतो.विद्यार्थांना त्या म्हणाल्या तुम्ही चांगले शिका व खुप मोठे व्हा,यावेळी गिता दुसाने या महिला फोटोग्राफर यांचा ही सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्यध्यापिका वंदना दिवेकर,मिना साखरे,संगिता वाकडे,अर्चना देशपांडे,संगिता बोर्ड ,यांची उपस्थिती होती.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें