पोटासाठी आम्हाला कचरा वेचावाच लागतो....महिला दिनाचं आम्हाला काय विशेष ? - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 7 मार्च 2018

पोटासाठी आम्हाला कचरा वेचावाच लागतो....महिला दिनाचं आम्हाला काय विशेष ?

 पोटासाठी आम्हाला  कचरा  वेचावाच लागतो  

महिला  दिनाचं आम्हाला  काय  विशेष ? 

शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी
युवराज पगारे : पहाटे  लवकर  उठायचे  आणि  हातात  बारदान घेऊन  गल्लो-गल्लीचा कचरा  वेचून  आणायचा  . दुपारी  हा  कचरा  वेगळा  करून  तो  भंगार  व्यावसायिकांना  विकून  मिळालेल्या  पैशात पोटापाण्याची सोय करायची. अशी  आमची  दिनचर्या आहे.  मग  दिवाळी -दसरा  असो की  महिला  दिन  असो  ,  आम्हाला  काम  करनं चुकल का ? असा  प्रतिप्रश्न जागतिक  महिला दिनाच्या  पुर्वसंध्येला  कचरा  वेचक  महिलांनी उपस्थित  केला.
     ▫जग  प्रगतीपथावर चालत  आहे  , समाजातील  काही  मोठा  वर्ग  पुढे  जात आहे,  सर्वाचा  विकास  होत  आसतांना आजही  खुप  मोठा  वर्ग  मागे  पडलेला आहे, यापैकीच  शहरातील  गल्लोगल्ली  नागरिकांनी  फेकलेल्या  घाणीतुन कागद, पुस्ठे, पाॅल्सिक ,पाॅलिथीन यासारखा  कचरा  वेचत  फिरणार्‍या  महिला  आजही  दिसुन येत आहेत, शहरातील पंचायत समिती  परीसर, ग्रामीण रुग्णालय,  पोस्ट  ऑफिस,विकास  नगर,  तुळजाभवानी  नगर, महात्मा फुले  चौक, जुनी तहसील , धनगरवाडी,  आशाच  काही भागात कचरा वेचून आपल्या कुटुंबाचा जिवननिर्वाह जगत आहेत, तहसील कार्यालय (एम. आय.डिसी ) परिसरात  गेल्या चार ते पाच वर्षांपासुन कचरा  वेचक महिलांचं वास्तव आहे.  आज  जागतिक  महिला  दिनानिमीत्ताने या परीसरातील  कचरा  वेचक  महिलांना  विचारणा  केली असता, त्यांनी सांगितले की, कसला  महिला  दिन,  आम्हानाही  माहिती नाही महिला  दिन,  आमच्या  साठी  सारे दिवस   सारखेच  आहेत,  अशा  प्रतिक्रीया मिळाल्या.  गरिबीमुळे, बेकारिने कुंटूब चालविण्यासाठी घरातील  माणसे  मातीकाम  करतात.  तर  बायका, मुली  कचरा  वेचून खर्चाचा  भार  उचलतात,  असेही  त्यांनी  सांगितले.  तसेच  कचरा  वेचक  महिला  मध्ये  घटस्फोटित,  विधवा,  नवर्‍याने  सोडून  दिलेल्या  किंवा  व्यसनी  नवर्‍याच्या  त्रासाने  त्याला  सोडून  दिलेल्याही अनेक  गरीब  महिला आहेत.  जगण्यासाठी  रोज  मरावे  लागते. या  प्रमाणे  या  महिलांना  दोन  वेळच्या  पोटापाण्यासाठी  क्षणा-क्षणाला मरावे  लागते,  स्वत:चे आरोग्य   धोक्यात घालून कचरा  कुंडीतुन,  नाल्या  कपारीतुन , रस्त्या-रस्त्याने नागरिकांनी  फेकून  दिलेल्या  घाणीच्या कचर्‍यातुन विविध  प्रकारचा  कचरा  गोळा  करण्याचे काम  या  महिला  अनेक  दिवसापासून  करत  आहेत, हा  एकत्रित  वेचलेला कचरा  नंतर  वेगवेगळा  करून  तो  भंगार  विक्रेत्यांकडे विकून  त्यापासून  मिळालेल्या  थोड्याफार  पैशातून  कुटूंबांचा गाडा  हाकणे,  हेच  आमच्या  नशिबी  आसल्याचे कासाबाई खिल्लारे  यांनी  खिन्न मनाने  सांगितले.

चौकट  : कसला  महिला  दिन ?
दररोज पहाटे  लवकर उठून  दुपापर्यंत  कचरा  जमा  करते.  त्यातुन  दिवसाला शंभर  ते  दीडशे रुपये मिळते. सकाळ  पासुन  गल्लोगल्ली  फिरुन देखील  कचरा  कमी  मिळत आहेत.  कसला  महिला  दिन माहिती  नाही.  माझ्या  सारख्या  कचरा  वेचणार्या  महिलांसाठी दिवाळी -दसरा सारे  दिवस  सारखेच आहे, 

- भागुबाई  किसन शिंदे कचरा  वेचक महिला  रा. अंबड,  जिल्हा जालना

चौकट  : कचराच  वेचणार
महिला  दिन  म्हणजे  नेमक काय  होणार आज ? सरकार  पैसे  देणार का ? प्रत्येक  दिवशी  कचर्‍यातुन  पोटापाण्याची  सोय  करणे  . हेच  आमचे  काम  आहे.

- सरस्वती कृष्णा शिंदे
कचरा  वेचक  महिला  रा. अंबड,  जिल्हा जालना

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें