कान्हड येथे पशु दवाखान्यात लाळ्या खुरकुत रोगाचे लसीकरण - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 21 मार्च 2018

कान्हड येथे पशु दवाखान्यात लाळ्या खुरकुत रोगाचे लसीकरण

कान्हड येथे पशु दवाखान्यात लाळ्या खुरकुत रोगाचे लसीकरण

 


कौसडी प्रतिनिधी

कान्हड येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात 20मार्च रोजी लाळ्या खुरकुत प्रतिबंधक लस देण्याचा प्रारंभ पं.स.सदस्य सचीन डोंबे यांच्या हस्ते झाला
अनेक वर्षा पासुन राज्यात लाळ्या खुरकुत प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने अनेक  पशु या  रोगाला बळी पडुन दगावले.आगोदरच पशुंची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असुन त्यातच लाळ्या खुरकुत रोगामुळे पशुधन मालक चिंताग्रस्त झाले होते या रोगांमुळे पशुधन दगावले जाऊ शकतात या मुळे रोगप्रतिबंधक लसीचे लसीकरण  देण्यात येणार आहे  या रोगामुळे जनावरांचे दुध कमी होणे ताप येणे तोंडातुन  लाळ गळणे अशी अनेक लक्षणे जनावरामध्ये दिसुन येतात पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी-1कुपाटा अंर्तगत गावातील जनावरांसाठी लस उपलब्ध करण्यात आले असुन जास्तीत जास्त पशुधन मालकांनी आपल्या पशुंना लसीकरण  करून घ्यावे.या लसीकरण प्रारंभी 50 ते 60जनावरांना लसीकरण  देण्यात आले
या लसीकरण प्रारंभी पं.स.सदस्य सचीन डोंबे,डाॅ.गिरीश गळाकाठु,सरपंच मुंजा डोंबे ,पंढरी डोंबे,सुधाकर मोरे,भागवत डोंबे,डीगाबंर डोंबे,रामकीशन डोंबे,बाबासाहेब मोरे,पुरूषत्तंम भोंडे यांच्या सह गावातील नागरिक उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें