कार-दुचाकी अपघातात बाप ठार तर मुलगा गंभीर जखमी - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 7 मार्च 2018

कार-दुचाकी अपघातात बाप ठार तर मुलगा गंभीर जखमी

कार-दुचाकी अपघातात बाप ठार तर मुलगा गंभीर जखमी

दुचाकी जळुनखाक, शिवदत्त पेट्रोलपंपासमोरील घटना

शे.मुनाफ पटेल
आडुळ ता. 6 (बातमीदार) पेट्रोल भरण्यासाठी पंपाकडे जात असतांना पाठीमागुन

येणारया वाक्स व्यागन कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वार एक

जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना झाल्टा (ता. औरंगाबाद)

शिवारातील शिवदत्त पेट्रोल पंपासमोर मंगळवारी (ता.६) राञी साडे आठ वाजेच्या

सुमारास घडली. अपघात येवढा भिषण होता की दुचाकी फरपटत गेल्याने त्याला

आग लागुन दुचाकीचा कोळसा झाला. अपघात होताच कार चालक कारसह

घटनास्थळावरुन फरार झाला होता.
शेख रशीद वय ५० वर्षे व त्यांचा मुलगा शेख शाकेर शेख रशिद वय १८ वर्षे

राहणार गांधेली (ता. औरंगाबाद) हे गांधेलीहुन दुचाकी (स्कुटी) मध्ये पेट्रोल

भरण्यासाठी झाल्टा शिवारातील शिवदत्त पेट्रोल पंपावर जात होते त्यावेळी बिड

बायपासने झाल्टा फाट्याकडे जाणारी वाक्स व्यागन कार क्रमांक एम एच २१ व्हि

४६४० ने स्कुटीला पाठीमागुन जोराची धडक दिली यात स्कुटी दुर पर्यंत फरफटत

गेल्याने स्कुटीला आग लागुन स्कुटीचा कोळसा झाला होता तर स्कुटीवरिल शेख

रशीद व त्याचा मुलगा शेख शाकेर शेख रशिद हा गंभीर जखमी झाले होते.

जखमी अवस्थेत दोघांना उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत आसतांना शेख रशिद

यांचा रस्त्यात मृत्यु झाला. अपघात होताच कार चालक जखमीची मदत न करता

घटनास्थळावरुन कार सह फरार झाला होता माञ चिकलठाणा पोलिसांना घटनेची

माहिती मिळताच त्यांनी करमाड पोलिसांना कळविले. करमाड पोलिसांनी नाकाबंदी

करुन गाढेजळगाव फाट्याजवळ कार जप्त केली. माञ चालक फरार झाला.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस

निरिक्षक सत्यजित ताईतवाले, नारायण कचकुरे, संदिप सोळुंके, दिपक इंगळे,

सुनिल गोरे, दिपक सुरासे यांनी घटनास्थळी धाव घेवुन वाहतुक सुरळीत केली.
फोटो कॅप्शन
झाल्टा ता. औरंगाबाद शिवारातील शिवदत्त पेट्रोल पंपासमोर झालेल्या

अपघातातील स्कुटी अशी जळुन खाक झाली तर दुसरया छायाचिञात अपघात

करुन पळुन गेले कार पोलिसांनी नाकाबंदी करुन ताब्यात घेतली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें