डिझेल दरवाढीमुळे चक्क नवरदेव बैल गाडीत
वांगी बू.येथील आगळा वेगळा विवाह
भराडी (बातमिदार अजय बोराडे ) लग्न म्हंटले की एकसे बढ़कर एक किस्से आपणास ऐकायला ,बघायला मिळतात.त्यातल्या त्यात नाविन्यपूर्ण काय करता येईल यावर भर देण्यात येतो .लग्न जवळ असो की दूर वरहाडी मंडळी व विशेसतहा नवरदेव नवरी हटके वाहनाने काही वेळा तर हेलीकैप्टरने आल्या गेल्याचे आपण हायटेक जमान्यात बघतो.
मात्र वांगी बू.येथील साळवे परिवारातील अमोल शेषराव साळवे व धानोरा येथील छाया शिवाजी काकडे यांच्या विवाह वेळी नवरदेव गेला तो आपल्या सरज्या - राजाच्या बैलगाडीतून व विवाहमधे प्रत्येक पाहुना,आप्तेस्ट विशेष मानून सत्कार समारंभाला फाटा देत,नवरी सासरी नेली ती बैलगाडीनेच .माहेर कडील मंडळीनेही जराहि कमीपना न दाखवता दिल्या घरी सुखी रहा म्हणत नवरदेव नवरीला निरोप दिला.
जूनं ते सोनंच योग्य मानून नवरदेवकंडील मंडळीने दुल्हन हम लाएंगे बैल गाडीसे म्हणत लग्नाला गेले व लग्न आटोपल्यावर दुल्हन हम ले जायेंगे बैल गाडीसे म्हणत नवरदेव नवरीची वरात आली चक्क बैलगाडीतून म्हणून त्यांच्या स्वागताला वांगी बू.गावातील बाळगोपाळासह ,जेस्टाानिहि गर्दी केलि होती.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें