पूर्णा तालुक्यातुन वाघाचे पालम तालुक्यात आगमन नागरिकांनी सतर्क राहण्याचे तहसीलदार यांचे आवाहन – वाघ सांगवी भुजबळ शिवारात असण्याची वन विभागाकडून माहिती
पालम ( *अनीस खुरेशी* ) पालम तालुक्यातील धनेवाडी, खुर्लेवाडी सायळा या शिवारात दि.१४ मार्च रोजी रात्री साडे दहाच्या सुमारात देऊळगाव ता.पूर्णा शिवरातून वाघाचा प्रवेश पालम तालुक्यात झाला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. हा वाघ गोदावरी गंगा ओलांडून पालम शिवारात आल्या नंतर धनेवाडी शिवारातील तुळशीराम साबळे यांच्या शेतातील आखाड्यावर गाईच्या वासरावर व शेळी वर त्याने हल्ला केला. तेथील एका वासराच्या मानेवर पाय देऊन वाघाने तोंडावर मोठ्या प्रमाणात जखमा केल्या आहेत. वासरावर वाघाने झड़प मारताच तेथील शेळी पळून गेल्याने ती वाघाच्या तडाख्यातून वाचली आहे. आखाड्यावरील शेतकरी वाघाच्या भीतीने रात्रभर झाडावर जाऊन बसले.धनेवाडीचे सरपंच शिवाजीराव साबळे सहगावातील काही नागरिकांनी वाघ गावात घुसू नये यासाठी बंद जिप मध्ये शिवारात फिरून रात्र जागून काढली त्यानंतर दि. १५ मार्च रोजी तीन वाजण्याच्या सुमारास परभणी, गंगाखेड येथील फॉरेस्ट ऑफिसर डाकोरे, नागरगोजे, भताने मॅडम, शेख देवकाते, भोसिकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या सोबत गावातील पोलीस पाटील, सरपंच व काही नागरिकांना सोबत घेऊन रात्रभर वाघाच्या पायाच्या ठशाच्या खूना नुसार शोध कार्य सुरु केले. या वाघाचा शोध पहाटे तीन पासून दुपारी दीड वाजेपर्यंत सुरु होता.आज दि . १५ मार्चच्या रात्री वन विभागाच्या वतीने धनेवाडी, ख़ुरलेवाडी, सायळा शिवारात वाघास जेरबंद करण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. हे पथक रात्रभर या भागात वाघाचा शोध घेणार होते. मात्र आज सायंकाळी सहाच्या सुमारास रावराजुर, भुजबळ सांगवीच्या शिवारातील गंगेच्या किनारी भागात वाघाच्या पायाचे ठसे वन विभाग व तेथील नागरिकांना निदर्शनास आल्याने वन विभागाने आता भुजबळ सांगवीच्या शिवारात वाघास जेरबंद करण्यासाठी सापळा लावला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने पालमच्या तहसिलदार तेजस्विनी जाधव यांनी या भागातील जनतेस आव्हान केले की, या भागात रात्री नागरिकांनी एकट्याने फिरू नये या घटनेवर पालम महसूल प्रशासन नजर ठेवून असल्याचे ही त्यांनी सांगितले
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें