मानवत येथील नगरपरिषद क्षेत्रातील रमाई घरकुल योजनेअंतर्गतच ८१ लाभार्थीना लाभ द्या- आ.मोहन फड - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 23 मार्च 2018

मानवत येथील नगरपरिषद क्षेत्रातील रमाई घरकुल योजनेअंतर्गतच ८१ लाभार्थीना लाभ द्या- आ.मोहन फड

मानवत येथील नगरपरिषद क्षेत्रातील रमाई घरकुल योजनेअंतर्गतच ८१ लाभार्थीना लाभ द्या- आ.मोहन फड


मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.२३: मानवत येथील नगरपरिषद क्षेञातील रमाई घरकुल आवास योजनेतील ८१ लाभार्थी चे नावे सामाजीक आर्थीक जात सर्वेक्षण २०११ च्या यादित समाविष्ट असलेल्या लाभार्थीना रमाई घरकुल आवास योजनातुनच लाभ द्यावे अशा मागणीचे निवेदन पाथरी विधानसभाचे आमदार मोहन फड व  युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी दि.२३ मार्चरोजी सामाजिक न्याय राज्यमंञी मा.दिलीप कांबळे यांना मुंबई येथे त्यांची भेट घेउन निवेदन  दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,रमाई आवास योजना २०१७/१८ या आर्थीक वर्षात परभणी जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्रासाठी एकुण १११९ घरकुल चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे या उद्दिष्टांच्या मुख्याधिकारी न.प. सर्व यांचे मागणीनुसार जिल्हाधिकारी परभणी यांच्या आदेशाने वितरन करण्यात आलेले आहे नगरपरिषद मुख्याधिकारी मानवत यांनी एकुण १२४ लाभार्थीना रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता प्रशासकिय मान्यता देण्याबाबत सिफारीश केली आहे.सादर केलेल्या १२४ लाभार्थी पैकी ८१ लाभार्थी चे नावे हि सन २०११ च्या सामाजीक आर्थीक जात सर्वेक्षण यादित समाविष्ट आहे यात शासनाच्या अधिसुचना पञ क्र.सकआ/ मावक/रआयो/ नागरी/ बैठक पञ क्र.४४९ / २०१७-१८ /का-१२/९२२दि.२० जुन २०१७ ज्यांची नावे सामाजीक आर्थीक जात सर्वेक्षण २०११ च्या  प्राधान्यक्रम यादित नाव समाविष्ट अशा लाभार्थीना प्रधानमंञी आवास योजनेअंतर्गत लाभ मिळणार असल्याने सदरील लाभार्थीना रमाई आवास योजनेतुन लाभ देण्यात येऊ नये या बाबत सुचना देण्यात आल्या आहेत तथापि सद्यस्थितीत ८१ लाभार्थीना राहण्यासाठी पक्के घर उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या निवासाचा प्रश्न उदभवला आहे.सदरील लाभार्थीना पंतप्रधान योजनेतुन लाभ मिळण्यास वेळ लागणार असल्याने त्यांना रमाई घरकुल आवास योजनेतुनच लाभ देण्यात यावा तसेच लाभार्थीनी १०० च्या मुद्राकावर लिहुन दिले आहे की आम्हास रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभ दिल्यास आम्ही पंतप्रधान आवास योजनेतुन लाभ घेणार नाही.नगरपरिषद क्षेत्रातील
सामाजीक आर्थीक जात सर्वेक्षण यादित समाविष्ट असलेल्या लाभार्थीना लाभ देण्या करिता आपल्या स्तरावरुन परवानगी द्यावी असे निवेदनात म्हटले आहे यावेळी युवानेते डॉ.अंकुश लाड उपस्थीत होते.या निवेदनावर पाथरी विधानसभाचे आमदार मोहन फड यांची स्वाक्षरी आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें