खुल्या प्रवर्गातील प्रसुतीसाठी आशा स्वंयसेवकांना मिळणार 200 रू मानधन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 23 मार्च 2018

खुल्या प्रवर्गातील प्रसुतीसाठी आशा स्वंयसेवकांना मिळणार 200 रू मानधन

खुल्या प्रवर्गातील प्रसुतीसाठी आशा स्वंयसेवकांना मिळणार 200 रू मानधन


जि.प.उपाध्यक्षा सौ भावना नखाते यांच्या प्रयत्नाची फलश्रुती


आसा निर्णय घेणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परीषद.


सेलू ( समशेर पठाण )
    ग्रामीण भागात आरोग्ययंत्रणेत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना अनुसूचित जाती-जमाती व दारीद्र्यरेषेखालील महिला लाभार्थ्यांच्या प्रसूतीसाठी मानधन दिले जात आहे परंतु इतर मागासवर्गीय खुल्या प्रवर्गातील महिलांच्या प्रसूतीसाठी कुठलेही मानधन दिले जात नव्हते .यासाठी  जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती  सौ.भानाताई नखाते यांच्या प्रयत्नातून आशा स्वयंसेविकांना प्रति लाभार्थी दोनशे रुपये मानधन देण्याचा निर्णय २३ मार्च रोजीच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुर करून त्यासाठी  अर्थसंकल्पामध्ये दहा लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . असा निर्णय घेणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद म्हणून परभणी चा उल्लेख करता येईल .
  ग्रामिण भागात  महिलांच्या प्रसुतीसाठी आशा स्वंयसेवीकाचे योगदान महत्वपुर्ण आहे .  यामध्ये अनु जाती ,अनु जमाती ,दारिद्र्यरेषेखालील महिलांच्या प्रसुती मदती करीता आशा स्वंयसेविकांना प्रती लाभार्थी ६०० रू मानधन शासनाकडून दिले जात आहे .परंतू  ईतरमागास्वर्गीय व खुल्या प्रवर्गातील महिलांच्या प्रसुतीसाठी आशा स्वंयसेवीकांनी मदत करूनही त्यांना कुठलेही मानधन दिले जात नव्हते .या बाबत जि.प.उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ भावना अनिलराव  नखाते यांनी गांभीर्याने विचार केला व ग्रामीण भागात काम करणार्या आशा स्वंयसेवीकेच्या कामाची दखल घेऊन २९ जानेवारी २०१८ च्या आरोग्य समिती च्या बैठकीत ईतरमागास्वर्गीय व खुल्या प्रवर्गातील महिला प्रसुतीसाठी आशा स्वंयसेवीकांना जिल्हा परीषदेच्या सेश फंडातुन २०० रू.मानधन देण्याचा ठराव मंजुर केला होता .व या ठरावास सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळावी अशी सिफारस केली होती .त्या प्रमाणे या ठरावास २३ मार्च रोजी झालेल्या जिल्हा परीषद सर्वसाधारण सभेत सर्व पदाधिकारी व सन्माननीय सदस्यांनी मंजरी दिली त्याच बरोबर सादर झालेल्या अर्थसंकल्पात हि याकरीता १० लक्ष रूपयाची तरतूद करण्यात आली आहे.व लाभार्थी संख्या वाढली तर त्याप्रमाणे निधीची अधिकत्तम  तरतूद करावी असेही नमूद केले आहे .
              जि.प.उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ भावना नखाते यांनी केलेल्या सहानुभूती पुर्वक प्रयत्नामुळे आशा स्वंयसेवीकांना दिलासा मिळाला असुन आशाप्रकारे निर्णय घेणारी परभणी जिल्हा परीषद हि महाराष्ट्रात पहिली जिल्हापरिषद आहे.

 *दुर्धर आजारासाठी दहा लक्ष रूपये तरतूद*
 २३ मार्च रोजी जिल्हा परीषद सभागृहात सादर झालेल्या अर्थसंकल्पात किडणी ,कँन्सर ,ह्रदयरोग या दुर्धर आजारासाठी नियमास अनुसरून आलेल्या प्रस्तावित लाभार्थांसाठी दहा लक्ष रूपयाची तरतुद केली अशी माहिती जि.प.उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ भावना नखाते यांनी दिली .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें