जळगावमध्ये ट्रक-रिक्षा अपघातात एकाच कुटुंबातील ३ ठार.
एरंडोल भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने समोरून येणार्या रिक्षाला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ६ वर पद्मालय हॉस्पिटलजवळ हा अपघात झाला झाला.
शेख गायसोद्दीन शेख अलौद्दीन (४५), परवीन बी गायसोद्दीन (४०) व तमन्ना बी गायसोद्दीन (९), अशी मृतांची नावे आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने जळगाव येथील हुडको परिसरातील हळहळ व्यक्त केली जात आहे. जळगाव येथून शेख कुटुंबीय रिक्षाने कासोदा येथे मुलगी पाहण्यासाठी जात होते. एरंडोलपासून केवळ एक किमी असलेल्या पद्मालय हॉस्पिटलजवळ समोर हा भीषण अपघात झाला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें