सरकारने महाराष्ट्र राज्य दारूमुक्त व्यसनमुक्त करण्याची घोषणा न केल्यास राज्यभर सरकारच्या विरोधात जनजागृती यात्रा काढनार =गणेश कदम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 23 मार्च 2018

सरकारने महाराष्ट्र राज्य दारूमुक्त व्यसनमुक्त करण्याची घोषणा न केल्यास राज्यभर सरकारच्या विरोधात जनजागृती यात्रा काढनार =गणेश कदम.

सरकारने महाराष्ट्र राज्य दारूमुक्त व्यसनमुक्त करण्याची घोषणा न केल्यास राज्यभर सरकारच्या विरोधात जनजागृती यात्रा काढनार =गणेश कदम.


सरकारने घेतली आंदोलनाची दखल

*ना बावनकुळे यांनी घेतली आंदोलकांची भेट

*एप्रिल मध्ये पहिल्या आठवड्यात होणार बैठक

काझी सलिम.
प्रतिनिधी,येवला.नाशिक.
आज संपूर्ण महाराष्ट्रातुन दारूबंदी जनआंदोलन समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने छत्रपती फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलन समितीचे अध्यक्ष व्यसनमुक्त महाराष्ट्र समनव्य मंचचे राज्य निमंत्रक गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आझाद मैदान येथे ५ व्या राज्यव्यापी आंदोलनाला उपस्थित होते.

या अगोदर मुंबई अर्थसंकल्प अधिवेशनावर 2015,16,17 तसेच हिवाळी आदिवेशन नागपूर येथे 2017 आणि आज ५ वे राज्यव्यापी 2018 अर्थसंकल्प अधिवेशनावर विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात आले


*या वेळी विचामंच्यावरून पुणे,सातारा,रायगड, अहमदनगर,औरंगाबाद, बीड,कोल्हापूर,जालना,परभणी,सोलापूर नागपूर ठाणे,मुंबई आणि नाशिकच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली*

या वेळी अध्यक्षस्थानावरून गणेशभाऊ म्हणाले की हे सरकार फक्त आश्वासने देत असून सरकारने दारूबंदी व्यसनमुक्त महाराष्ट्राचा अजेंडाची विधानसभेत घोषणा न केल्यास या सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलन समिती जनजागृतीयात्रेच्या माध्यमातून या सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आणेल
सरकारने वैध अवैध दारूविकणाऱ्यांच्या मागे भक्कमपणे उभी असून सरकारने *घरात हातभट्टी आणि दारावर अगरबत्ती* लावून आमचे सरकार किती चांगले काम करत आहे हे भासवून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करीत आहे पण सरकारने हे दारूधंदे उद्धवस्त न केल्यास जनआंदोलन समिती पुढाकार घेऊन ते उध्दवस्त केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सरकारला दिला या वेळी त्यांनी दारूमुळे होणाऱ्या विविध घटनांचे दाखले दिले
या वेळी व्यसनमुक्त महाराष्ट्र समनव्य मंच निमंत्रक वर्षा विलास,अनिसचे सरचिटणीस अविनाश पाटील,रंजना गवांदे,आदी मान्यवर आंदोलनस्थळी उपस्थित होते

*या वेळी या आंदोलनाची सरकारने दखल घेऊन ना बावनकुळे यांनी आंदोलकांना भेट दिली या वेळी ते म्हणाले आपण केलेल्या मागण्यांशी मी सहमत असून येत्या एप्रिलमध्ये पहिल्या आठवड्यात आपल्या समितीशी बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष माधवी पाटील,प्रदेश समनव्यक यश बच्छाव,जिल्हाप्रमुख दीप्ती गायकवाड, निफाड तालुकाप्रमुख शाम राऊत,पुणे जिल्हाप्रमुख राज भोसले,उज्वला झेंडे,धीरज वाल्मिकी पुणे शहर अध्यक्ष , विनायक सावरकर , मानसी कालेकर , सोनाली मरळ , कांता ताई पवार , गोरे ताई ,  सातारा जिल्हाप्रमुख प्रिया नाईक,रायगड जिल्हाप्रमुख भारती धाडवाल,औरंगाबाद जिल्हाप्रमुख ज्योती हांगे आणि नाशिक तालुकाप्रमुख संदीप मुठाळ आदींनी ना. बावनकुळे यांच्याकडे संघटनेची भूमिका मांडली*

*या आंदोलनात गेल्या तीन वर्षांपासून ज्या महिलांनी दारूबंदी आंदोलनात योग्यदान दिले त्यांचा गणेशभाऊ कदम आणि मान्यवरांच्या हस्ते  सत्कार करण्यात येऊन पुढील लढ्यासाठी सज्ज राहण्याचा निर्णय घेण्यात आला*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें