मुस्लीम महिला फुटिरतावाद्यांच्या गटाने काश्मीरमध्ये साजरा केला पाकिस्तानचा राष्ट्रीय दिन.
काश्मीर मधील महिला फुटिरता वाद्यांच्या एका गटाने गुरुवारी पाकिस्तानचा राष्ट्रीय दिन साजरा केल्याने खळबळ उडाली आहे. ‘आपल्यासाठी एक तर लोक मुस्लिम असतात किंवा काफीर असतात. पाकिस्तान हा मुस्लिमांचा देश आहे. पाकिस्तानची निर्मितीच मुळात नागरिकत्वाच्या धर्तीवर नव्हे तर इस्लामच्या धर्तीवर झाली आहे’ असे या कार्यक्रमात बोलताना या फुटिरतावादी महिला गटांच्या नेत्याने सांगितले.दुखतरन-ए-मिल्लत (राष्ट्रकन्या) असे या फुटिरतावादी महिलांच्या गटाचे नाव आहे. त्यांनी काल जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये पाकिस्तानचा राष्ट्रीय दिन साजरा केला. यावेळी पाकिस्तानचे ऱाष्ट्रगीत गात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावण्यात आला.
दुखतरन-ए-मिल्लत संघटनेची प्रमुख आणि कट्टर फुटिरतावादी महिला नेता असिया अन्द्राबी हीने काही महिलांना एकत्र करुन श्रीनगरमध्ये हा कार्यक्रम घेतला. याचा एक व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल झाला आहे. यामध्ये बुरखा परिधान केलेल्या महिला दिसत आहेत. त्या पाकिस्तानचे राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत. तसेच पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावताना दिसत आहेत.
यावेळी बोलताना असिया अन्द्राबी म्हणाली, आपण पाकिस्तानचा हा राष्ट्रीय दिन इतर कोणाच्यातरी जमीनीवर साजरा करीत नसून ही जमीन आपलीच आहे जी भारताने बळकावली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें