‘ ह्या ‘ कारणांमुळे येत्या निवडणुकीत मनसेला चांगले यश मिळण्याची शक्यता. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 30 मार्च 2018

‘ ह्या ‘ कारणांमुळे येत्या निवडणुकीत मनसेला चांगले यश मिळण्याची शक्यता.

‘ ह्या ‘ कारणांमुळे येत्या निवडणुकीत मनसेला चांगले यश मिळण्याची शक्यता.


२०१४ पूर्वीच काँग्रेस – राष्ट्रवादी सरकार सत्तेत असताना झालेला प्रचंड भ्रष्टाचार, घोटाळे, प्रचंड मोठ्या घोटाळ्यांनी आणि वाचाळतेणे बदनाम झालेले मंत्री, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे केलेला कानाडोळा ह्या सगळ्याचे पाप म्हणून कि काय या सर्व कारभाराला सर्वसामान्य जनता प्रचंड ग्रासली होती आणि हाच मुद्दा उचलून धरत भाजप सरकार मोदी लाटेवर स्वार होऊन सत्तेत आलं. यात भाजप पेक्षा देखील वैयक्तिक मोदी यांची जादू जास्त होती . ‘अच्छे दिन आणे वाले है’ याला जनता भुलली आणि भाजप सत्तेत आले . मात्र सत्तेत आल्यानंतर नोटबंदी आणि जी.एस.टी यांनी सामान्य जनतेचे कंबरडेच मोडून टाकले. मात्र आता भाजपच्या घोषणा आणि अच्छे दिन याचा फुगा फुटलेला असून भाजपच्या तसेच शिवसेनेच्या देखील विरोधात नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.

निवडणुका झाल्या आणि भाजप सरकार सत्तेत आल्यावर केंद्र सरकारने बरेच धाडसी निर्णय घेतले जे सुरवातीला जनतेला आकर्षक वाटले उदाहरणार्थ नोटबंदी. परंतु कालांतराने त्यातील वास्तव जस जसे अनुभवी लोकांकडून समोर येऊ लागले, ज्यामुळे सामान्य जनतेतील रोष वाढताना दिसत आहे. २०१४ मधील निवडणुकीतील विजयानंतर देशापेक्षा भाजप २०१९ पर्यंत कशी वाढेल आणि मोठी होईल याचीच आखणी चालू आहे . सामान्य जनतेचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. चुनावी जुमलाची कबुली देखील अमित शाह यांनी दिली असल्याने विकासाचे लॉलीपॉप आता जनता कबूल करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. जसे काँग्रेसचे मंत्री तसेच भाजपचे देखील सुरु आहे . मूळ विकासाचा मुद्दा बाजूला सारत ट्रिपल तलाक,हलाला, हज सबसिडी आणि पाकिस्तान अशा गोष्टींवरतीच जास्त लक्ष दिले आहे. त्यामुळे देखील लोकांमध्ये नाराजी असून मूळ विकास नावाची कोणतीच गोष्ट झालेली नाही .

देशाला दिलेली मोठं मोठी आश्वासन केवळ निवडणुकीतील संधी साधूपणा ठरत आहेत. नोटबंदी च्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच तरुणांवर मोदी मॅजिक फिवर असा काही चढताना दिसला की दहावी नापास झालेले युवकही गल्ली बोळ्यात RBI किंव्हा RBI गव्हर्नर कसे चुकीचे आहेत आणि मोदी कसे योग्य आहेत याचे इतरांना धडे देताना दिसत होते. एकूणच भाजपची आश्वासनाची खैरात २०१९ मध्ये हि अशीच चालू राहण्याची चिन्ह आहेत.भाजपची फौज हेच काम करत आहे.

देशातील वाढत जाणारी महागाई, पायाभूत सुविधांचा अभाव, ग्रामीण भागातील जनतेच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष्य, दिवसेंदिवस तरुणांमधील वाढत जाणाऱ्या बेरोजगारीचे प्रमाण, वाढत जाणार महिला आणि बाल अत्याचाराचं प्रमाण, शैक्षणिक क्षेत्रातील खेळखंडोबा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य जनतेला काँग्रेस – राष्टवादी च्या काळातील कुचकामी मंत्रांच्या इतकेच कुचकामी वाटू लागलेले सध्याचे भाजप-शिवसेना मंत्रिमंडळातील मंत्री. या सर्व घटना बघता सामान्य जनतेच्या सर्व आशा अपेक्षा काँग्रेस सरकार जाऊनही तशाच आहेत किंबहुना त्यापेक्षाही महागाई या विषयावर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. जसे भ्रष्टाचाराचे आरोप भाजप मधील मंत्र्यांवर झाले तसेच ते शिवसेनेच्या काही मंत्र्यांवर सुद्धा झाले आहेत . अशा परिस्थितीमध्ये जनतेमध्ये मोठा आक्रोश असून काँग्रेस मधून तसेच राष्ट्रवादीमधून देखील तेवढे आश्वासक असे नेतृत्व लोकांना मिळत नाहीये . अशा परिस्थितीत राज ठाकरे आणि दिलेल्या सत्तेच्या आवाहनाला जनता पूर्वीपेक्षा चांगला प्रतिसाद देऊ शकते , असा जाणकारांचा अंदाज आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें