जावयाची सासर्याच्या शेतात आत्महत्या,सोनवटी येथील घटना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 30 मार्च 2018

जावयाची सासर्याच्या शेतात आत्महत्या,सोनवटी येथील घटना.

जावयाची सासर्याच्या शेतात आत्महत्या,सोनवटी  येथील घटना.


सेलू (प्रतिनिधी )
                  सेलू तालुक्यातील सोनवटी येथे वास्तव्यास असलेल्या जावयाने सासर्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार दोन दिवसांनंतर लक्षात आला असून २९ मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले  अहिलाजी आकात असे मयत व्यक्तीचे नांव आहे.
                              . याबाबत पोलीस पाटील माणीक सोळंके यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की सोनवटी  येथील तुकारामजी सोळंके यांचे प्रथम जावई अहिलाजी आकात  (मुळगांव सातोना ता. परतुर जि.जालना) यांनी गतवर्षी सातोना येथील रहाते घर विकून सोनवटी  येथे तुकाराम सोळंके यांच्या घरी ते एक वर्षापासून  स्थायिक झाले होते २७ मार्च रोजी  सकाळी ५ वा . शौच्यास जातो म्हणून घरातून निघून गेले मात्र ते परत न आल्याने घरातील मंडळींनी त्यांचा शोध घेतला दुसऱ्या दिवशी २८मार्च रोजी सासरे तुकारामजी सोळंके यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला अहिलाजी आकात यांचे प्रेत  लटकलेले दिसले याबाबतची खबर तुकारामजी सोळंके यांनी सेलू पोलीस ठाण्यात दिली व अहिलाजी आकात हे तापड व रागीट स्वभावाचे असल्याने आत्महत्या केली असे कळविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ नितीन काशिकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौरे यांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी सेलू उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी निलंगेकर यांनी केली व प्रेत नातेवाईक यांचे ताब्यात दिले .सोनवटी येथे २९ मार्च रोजी दुपारी ४वा.अहिलाजी आकात यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें