राजकीय पक्षात कधीच नव्हतो ; तर बडतर्फीचा विषय येतो कुठून - छगन शेरे - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 28 मार्च 2018

राजकीय पक्षात कधीच नव्हतो ; तर बडतर्फीचा विषय येतो कुठून - छगन शेरे

राजकीय पक्षात कधीच नव्हतो ; तर बडतर्फीचा विषय येतो कुठून  - छगन शेरे 


मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचा प्रदेशउपाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे. व यापुर्वी देखील मी सामाजिक संघटनेतच काम करत होतो. संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षांशी माझा काडीमात्र संबंध नाही. म्हणून मला बडतर्फ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या उलट मनोज आखरे यांनी संभाजी ब्रिगेड या नोंदणीकृत सामाजिक संघटनेचे नाव राजकीय पक्षाला देऊन समाजाचा व विचारधारेचा विश्वासघात केला आहे. पुरोगामी विचारांना तिलांजली देत भाजपचे हस्तक म्हणून मनोज आखरे काम करीत आहेत. या चुकीच्या पद्धतीला कंटाळून राज्यभरातील 27 संभाजी ब्रिगेडच्या जिल्ह्याध्यक्ष व ऐंशी टक्के राज्य कार्यकारणीतील पदाधिका-यांनी प्रविणदादा गायकवाड यांचे नेतृत्व मान्य केले आहे. येत्या काळात संभाजी ब्रिगेडचे बेकायदेशीर नाव वापरून राजकीय पक्ष स्थापन केल्या प्रकरणी मनोज आखरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें