वेतन वाढीपासुन वंचित
सेलु(प्रतिनिधि) :सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा 12 व 24 वर्षाचा वेतन वाढीचा लाभ न देता वेतन वाढीपासुन वंचित ठेवल्याचा प्रकार घडला आहे. सेलु येथील सुभाष दुर्गाजी काळे हे आरोग्य विभागात(कुष्ठरोग) कुष्ठतग्य पदावर कार्यरत होते.त्यांनतर त्यांना अवैद्यकिय पर्यवेक्षक पदावर बढती मिळाली शासन आदेशानुसार त्यांना 12 वर्ष सेवा पुर्ण झाल्यानंतर पहील्या वेतन वाढीचा लाभ मिळाला होता तर त्यानंतर 24 वर्षीचा वेतन वाढीचा लाभ मिळाला नाही. तर आरोग्य विभागाने केवळ गोपनिय अहवालाचे कारण पुढे करुन ही वेतन वाढ रोखली असल्याने व माझी पहिली वेतन वाढ करण्यात आली होती त्यावेळी सर्व गोपनिय अहवाल कार्यालयाकडे सादर केले होते. सदरिल दोन्ही वेतनवाढी सोबत मिळणे अपेक्षित होते परंतु केवळ एकच वेतन वाढ देण्यात आली असुन माझ्यावर अन्याय करण्यात आला असुन माझ्या वेतनवाढीवर तात्काळ निर्णय देण्यात यावा नसता 31 मार्च नंतर अमरण उपोषण करण्याचा इशारा सहसंचालक आरोग्य सेवा(कुष्ठरोग व क्षयरोग) पुणे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें