सांस्कृतिक कार्य संचानलयाच्या वतिने लोककला कार्यक्रम संपन्न - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 20 मार्च 2018

सांस्कृतिक कार्य संचानलयाच्या वतिने लोककला कार्यक्रम संपन्न

सांस्कृतिक कार्य संचानलयाच्या वतिने लोककला कार्यक्रम संपन्न...


   प्रतिनिधी : भोकरदन(शेख सलीम)

  भोकरदन येथे १८ मार्च रोजी सायकाळी ६ ते ८ या वेळेत महाराष्ट शासन कलांगण सांस्कृतीक कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात पार पडला,यात अनेक लोक कलावंतांनी चांगल्या प्रकारे भारूड,पोतराज,लोकगिते,गोंधळ,आणि पोवाडा कलेतुन प्रबोधनात्मक व्यसनमुक्ती ,स्ञीभ्रुणहत्या ,व्यसनाधिन होत चाललेली तरूण पिढी,नवयुवा समाज जागृतीचे चांगल्या प्रकारे एका पैक्षा एक सरस कलापथकांनी उन्नतीचे कार्य आपल्या सादरिकरणाच्या माध्यमातुन केले.

   यावेळी लेक वाचवा या विषयावर जाफराबाद तालुक्यातील कोनड येथिल ग्रामिण विकास प्रतिष्ठान कलापथक यांनी चांगल्या प्रकारे आपली कला सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.यावेळी भोकरदन शहरातील वरिष्ठ अधिकारी ,पदाधिकारी,गावकरी यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात कार्यक्रम पार पडला,यामध्ये शाहिर नानाभाऊ परिहार,उत्तम तळेकर,मोहन परिहार,भगवान ढवळे,सुरेखा पगारे,जनार्धन पैठणे,शिवाजी वायाळ,भाऊसाहेब पगारे,अदि कलावंतांनी उत्कृष्ठ संगितसाथ देऊन शहरातील चांगल्या प्रकारे नाव लौकिक मिळवले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें