भोकरदन शहरात जंगळी अस्वलचा धुमाकूळ
दोन तरुणासह एका महिला गंभीर जखमी...
भोकरदन प्रतिनिधी : (शेख सलीम)
भोकरदन शहरात पाण्याच्या शोधात भरकटलेल्या एका अस्वलाने मंगळवारी सकाळ पासून धुमाकूळ घातला भोकरदन शहरातील फुलेनगर येथील रहिवासी व फत्तेपुर येथील महिला व मुलावर अस्वलाने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाले आहे.
अधिक माहिती अशी की,भोकरदन शहरातील फुलेनगर(धंनगरवाडी) येथील आकाश आशोक सपकाळ वय 16 हा सकाळी जवळच असलेल्या शेतातील महादेव मंदिर जवळ सकाळी 7 वाजता दूध काढण्यासाठी गेला असता अचानक अस्वलने त्याच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात अस्वलाने त्याच्या मांडीचा चावा घेतला व मांडीला मोठी इजा झाली असून दहा टाके पडले आहे.व जवळच असलेल्या शेतात गणेश सपकाळ याने आरडा-ओरडा केला व मदतीला धावत जाऊन दगडाच्या व काठीच्या साह्याने हाकलून लावले. लगेच त्यांनी आकाशला शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणाल, व प्रथम उपचार केला व औरंगाबाद घाटी दवाखाण्यात रेफर करण्यात आले.तसेच फत्तेपुर येथिल रूख्मणबाई तळेकर वय ५० या शेतात कामासाठी गेल्या असता त्यांच्यावरही या अस्वलाने हल्ला केला,तसेच ३:३० च्या दरम्यान शुभम संजय गायकवाड वय १९ हा शेताकडे जात असतांनी त्याच्यावरही या अस्वलाने हल्ला चडवला असुन हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत,त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथिल घाटी रूग्णालयात रेफर करण्यात आले असुन तिथे उपचार घेत आहे.
या जखमी मधील आकाश हा शिवाजी हायस्कुलचा विद्यार्थी असून त्याचे दहावीचे पेपर चालू आहे व उद्या सकाळी न्यु हायस्कुल येथे परीक्षा केंद्रावर त्याचा भूगोलाचा पेपर असल्याने आकाशने सांगितले. शहरापासून जवळच नांजा,कुंभारी, क्षीरसागर,फत्तेपुर,मासनपुर, जोमाळा येथील गावांत अस्वलने धुमाकूळ घातला असुन परिसरातील नागरिकांमध्ये अस्वलची दहशत निर्माण झाली आहे.येथील नागरिकांनी वनविभागाला माहिती दिली असुन जालना व अजिंठा येथिल वनविभागतील वनरक्षक एस.एन. बुरकुले, व्हि. एन .तिडके,रमेश सुसर,ए.एस .भोळे, एस. जी. गाडेकर, दिलीप जाधव ,वनपाल एम .आर .शेख,संतोष दोडके ,डांगे ,एस .के .हिवाळे इत्यादी जणांचा समावेश होता .कर्मचारी फत्तेपुर शिवारात अस्वलाचा शोध घेत आहेत.तरी या अस्वलाचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें