आई वडिलांच्या सेवेतच ईश्वरसेवा-सत्यपाल महाराज व्यसन करु नका*शेतकऱ्यानो आत्महत्या करू नका*देहदानाचा संकल्प करा.
आजय बोराडे.सिल्लोड (प्रतिनिधी)-मूल बाळ असून देखील आज वृद्धाश्रमात अनेक म्हातारे जोड़पे एकलेपनाचे जीवन जगत आहे.ज्या माता पित्याने आपल्याला जग दाखविले त्यांच्यावर ही वेळ येने हे दुर्दैव असून आई वडिलांचे उपकार विसरु नका त्यांच्या सेवेतच ईश्वरसेवा आहे.आजकालची तरूणाई एकमेकांच्या प्रेमात पडते. त्यातून आत्महत्येसारख्या अप्रिय घटनाही घडतात.असे बलिदान काय कामाचे? प्रियकर, प्रेयसीसाठी बलिदान देण्यापेक्षा तरुण तरुणींनो देशासाठी बलिदान करा असा उपदेश प्रख्यात सप्तखंजिरी वादक प्रबोधकार राष्ट्रीय किर्तनकार सत्यपाल महाराज यांनी सिल्लेाड येथे दिला.
कै.विश्वनाथ आप्पा क्षीरसागर यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमीत्त सप्तखंजेरी चे निर्माते राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक सत्यपालची सत्यवाणी या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत क्षीरसागर व विशाल क्षीरसागर यांनी केले होते हा कार्यक्रम सोमवारी (दि.२६) रोजीशहरातील ३६ एकर मैदान शिक्षक कॉलनी परीसरात पार पडला.यावेळी सत्यपाल महाराज बोलत होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज,गाडगे बाबा,तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवारांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुण करण्यात आली.
यावेळी पुढे बोलतांना सत्यपाल महाराज म्हणाले की युवकांनो आधी शिका, स्वत:ला सुसंस्कारात घडवा. त्यानंतर आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीशी लग्न करा,असा वडीलकिचा सल्ला देत या देशासाठी भगतसिंग, चंद्रशेखर, राजगुरू यांनी या देशासाठी प्राण त्यागले. या बलिदानाचा विसर पडू देऊ नका. आपण बलिदान कशासाठी करीत आहोत, याचे भान ठेवा. प्रेमप्रकरणातून आत्महत्या करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. व्यसन समाजाला पोखरून खात आहे. त्यामुळे व्यसनापासून कायम दूर रहा असे म्हणत शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका असे आवाहन केले.तर समाजातील लोकांनी देहदान करा जेनेकरुन कोणाला तरी जीवदान मिळेल असे मत व्यक्त करीत संत तुकाराम,महात्मा फुले,शाहू महाराज ,बाबासाहेब आंबेडकर,गाडगे बाबा,तुकडोजी महाराज यांच्या विचाराची समाजाला आज खऱ्या अर्थाने असलेली गरज ,देशातील शेतकरी बांधव कसा सुखी होईल,व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा जुन्या रूढी परंपरा,संघटन,स्त्री भ्रूण हत्या,शैक्षणिक विकास,स्वच्छ भारत अभियान,हागणदारी मुक्त ग्राम,पॉलिथीन बंदी,घनकचरा वर्गीकरन,जातीयवाद या विषयावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राम जंजाळ यांनी तर आभार जगदीश नारळे यांना मानले
यावेळी माजी आ. सांडू पाटिल लोखंडे,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिराजदार,सेवा निवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे,ग्रामीण सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील,सुरेश बनकर,ठगणराव भागवत पाटिल,कृषि उत्पन्न बाजार समीति सभापती रामदास पालोदकर, ज्ञानेश्वर मोठे, दुर्गाबाई पवार,सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन इद्रीस मुल्तानी,श्रीरंग साळवे,अशोक गरुड,नगरसेवक सुनील मिरकर,विलास पाटिल,कमलेश कटारीया,राजेंद्र ठोंबरे,बनेखा पठान,प्रभाकर पारधे,किशोर अग्रवाल,दादाराव आळणे,विनोद मंडलेचा,विनोद भोजवानी,मनोज झंवर,नरसिंग चव्हाण,राजू गौर,बुलढाणा अर्बन बॅकेचे व्यवस्थापक संजय दळवी,नाना वळवले,अभय वाघ,डॉ नीलेश मिरकर,मनोज मोरेल्लु,राजेश खिंवसरा,पंजाबराव चव्हाण,डॉ भाऊसाहेब तायडे,मुकुंद अप्पा कोठीवाले,,दुर्गेश राजपुरोहित,कुणाल सहारे,पत्रकार प्रकाश वराडे,शामकुमार पुरे,प्रदीप ढाकरे,सचीन चोबे,निलेश सोनटक्के,जावेद सौदागर,जगदीश नारळे,सोहेल कादरी,बशीर पठाण,विलास नरवाडे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी,प्रतिष्ठीत नागरीक,व्यापारी,वकील,डॉक्टर,महिला व बालवर्गाची मोठ्या संख्येने उपस्तिथी होती.
दारुमुळे माझा पती मृत्युमुखी.....तुम्ही दारू पिऊ नका..सत्यपाल महाराजांचे किर्तन सुरु असतांना एका महिलाणे त्याच्यावरील आपबीती सांगितली की माझे पती रोज दारु पित होते त्यामुळे त्यांच्या किडण्या खराब झाल्या अनेक उपचार करुण देखील काहीच उपयोग झाला नाही शेवटी माझ्या पतीची दारुमुळे प्राणज्योत मालावली असे म्हणत युवकांनो दारुचे व्यसन करू नका ज्यामुळे तुमचे आयुष्य बर्बाद होईल असे आवाहन करताच उपस्थीथांचे डोळे पानावले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें