कर्मयोगी अकुंशराव टोपे समर्थ साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी श्री.फारुख.दुंगे यांना नॅशनल सेफ्टी एक्सलन्स अवार्ड प्रदान - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 27 मार्च 2018

कर्मयोगी अकुंशराव टोपे समर्थ साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी श्री.फारुख.दुंगे यांना नॅशनल सेफ्टी एक्सलन्स अवार्ड प्रदान

कर्मयोगी अकुंशराव टोपे समर्थ साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी श्री.फारुख.दुंगे यांना नॅशनल सेफ्टी एक्सलन्स अवार्ड प्रदान.


अंबड : जहिर शेख /शहागड राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे निमित्ताने नॅशनल इन्स्टिट्यूट प्रसनल मॅनेजमेंट एनआयपीएम एम.एस.इ.चेबर ऑफ इंडिया व आरूष फायटर सिस्टीम या नामांकीत कंपनीच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल सेफ्टी एक्सलन्स अवार्ड 2018 पुरस्काराचे वितरण दि.24 मार्च ला पिंपरी चिंचवड पुणे येथील सभागृह यशस्वी पने पार पडले. यामध्ये कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी श्री.फारुख.एम.दुंगे यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.यावेळी भारत फोर्जचे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापक डॉ,भावे, गेस्टमप अटो ईएसएस प्रमुख रूपेश कदम,एमआय डिसी चे  चीफ फायर ऑफिसर गायकवाड,इंगवले प्रकशनाचे देवधर, किर्लोस्कर समूहाचे सचिन रहालकर, अरूष फायटरचे फाउंडर अर्जुन जाधव,अरूषचे सिईओ राहुल जाधव ,निवेदकार बच्चू पांडे व बजाज, गोदरेज यादी कपंनीचे मान्यवर उपस्थित होते.हा पुरस्कार विविध क्षेत्रांमध्ये चांगले काम करणाऱ्या उद्योग समुहाच्या अधिकारीवर्गाला राष्ट्रीय सुरक्षा मोहिमेतील प्रत्येक चळवळीत सक्रिय सहभाग घेण्याऱ्या तथा चाचणी परीक्षेत  निवड झालेल्या महाराष्ट्रातील सहा सुरक्षा अधिकाऱ्यांना सदरचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.
 या वेळी प्रमुख सहा पुरस्कारांमधील मधिल
  श्री फारुख दुंगे यांना कारखान्यात कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ न देने,पर्यावरण सुरक्षा मोहीम सहभागी, औद्योगिक अग्निसुरक्षा, कामगार वर्ग, स्वच्छता अभियान मोहिम तथा आरोग्य सुरक्षा,या निष्कर्षावर प्रथमच सहकारी साखर उद्योगातील पुरस्कार घेणारे श्री.फारुख दुंगे हे एकमेव व पहिले सुरक्षा अधिकारी आहेत.त्यांच्या या यशाबद्ल कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती शारदाताई टोपे,कारखान्याचे मार्गदर्शक आमदार श्री राजेश टोपे, उपाध्यक्ष उत्तमराव पवार,कार्यकारी संचालक श्री.बी.टी.पावसे,     कार्यलक्ष्मी संचालक श्री.सुधाकरराव खरात,व्ही.के आढाव, जनसंपर्क अधिकारी श्री.सुधाकर चिमणे, वर्कर र्मॅनेजर श्री.सुरवसे,चीफ अकौंटंट श्री.पगार,चीफ केमिस्ट्री श्री. पवार,मुख्य शेतकी अधिकारी श्री.ढोबळे, डिसलरी इन्चार्ज श्री.निबे,लेबर ऑफिसर श्री.देशमुख, सिव्हिल इंजिनिअर श्री.ठोंगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोटे, स्टोर कीपर ऐ.जी.पठाण,तथा सर्व अधिकारी कर्मचारी व कामगार यांनी अभिनदंन व्यक्त केले.तसेच त्यांचे मित्रपरीवार व नातेवाईकाकडून अभिनंदन करण्यात आले.
फोटो मध्ये : नॅशनल सेफ्टी एक्सलन्स अवार्ड 2018 आरूष फायटरचे सिईओ राहुल जाधव यांच्या शुभहास्ते  अवार्ड स्वीकारताना कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ चे सुरक्षा अधिकारी श्री.फारुख.एम.दुंगे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें