डीवायएसपी ऑफिस लगत लाचखोर लिपिक ए सी बी च्या जाळ्यात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 8 मार्च 2018

डीवायएसपी ऑफिस लगत लाचखोर लिपिक ए सी बी च्या जाळ्यात.

डीवायएसपी ऑफिस लगत लाचखोर लिपिक ए सी बी च्या जाळ्यात.

मौलाना सिराजोद्दीन नदवी.
प्रतिनिधी.जिंतूर
शहरातील लघुसिंचन उपविभागातील कनिष्ठ लिपिक बाबुराव आप्पाराव सोनवणे याला बाराशे रूपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकड़ले याच इमारतीत डी वाय एस पी ऑफिस आहे असे असतानाही  त्याच्याय कार्यलयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी यांनी गुरुवार 8 मार्च रोजी ही कार्यवाही केली
याबाबत सविस्तर वृत्त असे कि सेलु तालुक्यातील मौ.देऊळगाव ( गात )येथील 43 वर्षीय शेतकरी यांच्या शेतातील विहिरीच्या कामांसाठी तांञिक मंजुरी देण्यासाठी सदरील शेतकर्याकडे त्यांनी बाराशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. व हि रक्कम कार्यालयात देण्याचे ठरले होते. परंतू सदरील शेतकर्याने एसीबी कडे तक्रार दाखल केली होती.याप्रकरणी परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी यांनी कार्यालयात सापळा रचला व या कारवाईत सोनवणे यांना बाराशे रूपयांची लाच स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आली.याच इमारतीत जिंतुर तालुक्याचे पोलिस उप विभागीय कार्यालय असताना ही लाचखोर सोनावणे ला भीति पण वाटली नाही हे विशेष या कारवाईत परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद सु.भारती व एन.एन.बेबडे व ला.प्र.वि.परभणी यांच्या टीम ने कारवाई केली आहे,
सदरील सापळ्यातील रक्कम जप्त करण्यात आली असुन जिंतूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें