युवतीच्या अत्याचार प्रकरणी बिरसा क्रांती दलाच्या वतीने जिंतुर तहसीलदारांना निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 27 मार्च 2018

युवतीच्या अत्याचार प्रकरणी बिरसा क्रांती दलाच्या वतीने जिंतुर तहसीलदारांना निवेदन.

युवतीच्या अत्याचार प्रकरणी बिरसा क्रांती दलाच्या वतीने जिंतुर तहसीलदारांना निवेदन.


जिंतुर-
दि-(२७/०३)
वर्धा जिल्ह्यातील धपकी शिवारात  आदिवासी समाजातील एका १९वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याच्यार करुन तीची निर्घुन हत्या करणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करुन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासह ईतर मागण्यासह आज दि(२७)रोजी जिंतुर तहसीलदार यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे *बिरसा क्रांती दल परभणी जिल्हा* यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे.

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील धपकी शिवारात शोभा वय-१९ (नाव बदलले आहे) या युवतीवर १९मार्च रोजी काही नराधमांनी पाशवी बलात्कार करुन तिच्या देहाची विटंबना केली होती.घटनेला ८दिवस उलटुन गेले असताना अद्यापहि आरोपी मोकाट आहेत,  सेलू तालुका स्थानीक पोलीस प्रशासनाला आरोपी अटक करण्यात अपयश आले असून पोलीस प्रशासन हतबल ठरले आहे. या अमानवी घटनेचा आज तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन *बिरसा क्रांती दल परभणी जिल्हा* कार्यकारणीच्या वतीने जिंतुर तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि सदरील प्रकरनातील मोकाट आरोपींना तात्काळ अटक करुन प्रकरणात विशेष ज्येष्ट अभियोक्त्याची नेमणुक करून त्यांच्या विरोधात फास्ट ट्रैक कोर्टात खटला चालवुन नराधम आरोपींना मरे पर्यंत फाशिची शिक्षा देण्यात यावी, निवेदनावर *बिरसा क्रांती दल परभणी* जिल्हाध्यक्ष एकनाथ वाळके, जिल्हा सचीव विठ्ठल कोकाटे, जिंतुर तालुकाध्यक्ष बापूराव कर्हाळे बी एस फोर जिंतुरचे प्रमुख रत्नदीप शेजावळे यांच्यासह संतोष गायकवाड, दिनकर धनवे, नितीन कोकाटे, महादेव खेलबाडे, सुनील माघाडे, मधुकर घनसावध, बंडू गायकवाड, भीमराव हजारे, कुंडलिक कर्हाळे,  मैनाजी चिभडे, राजेश्वर कर्हाळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें