भगवान महावीर जयंतीनिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने शेकडो विद्यार्थ्यांना अन्नदान - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 27 मार्च 2018

भगवान महावीर जयंतीनिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने शेकडो विद्यार्थ्यांना अन्नदान

भगवान महावीर जयंतीनिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने शेकडो विद्यार्थ्यांना अन्नदान 


भोकरदन प्रतिनिधी :(शेख सलीम)
दि.27/मार्च शहरातील सकल वतीने भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त दि.27 मार्च रोजी मंगळवार ला भोकरदन येथील गणपती इंग्लिश  स्कुल येथे  आयोजित करण्यात आला या वेळी विविध शाळेचे मुखबधीर अपंग विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले यावेळी सकल जैन समाजाच्या वतीने सांगण्यात आले की  येत्या 29 तारखेला जगाला अहिंसेचे तत्वज्ञान सांगणारे भगवान महावीर यांची जयंती उत्सव करण्यात येणार आहे व शहरातून भव्यदिव्य अशी भगवान महावीर यांची सालाबादप्रमाणे शोभायात्रा काढण्यात येणार आहे तरी सर्वं  मिरवणूक मार्गावरील रहिवाशांनी परिसरामध्ये स्वच्छता ठेऊन रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत करावे व पिण्याच्या पाण्याचा वापर ही जपून करावा शोभायात्रे ला सुरुवात सकाळी 9 वाजता नवीन बाजारपट्टी जैन मंदिर येथून पुढे हेडगेवार चौक सराफा मार्केट रोकडा हनुमान मंदिर पासून पुन्हां जैन मंदिर येथे समाप्ती होईल तरी सर्व समाजातील नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती करण्यात आली आहे या वेळी नगरसेवक संतोष अन्नदाते,भारतीय जैन संघटना तालुका अध्यक्ष मयुर बाकलीवाल, ,रोहित बाकलीवाल,संजोश बाकलीवाल, मयुर आंबेकर,डॉ. आकाश पांडे,राकेश पानसरिया,अमित खुळे, विश्वास आंबेकर,जितु भंसली,श्रेणीक पारख,अतुल पानसरिया गौरव जैन,निर्मल पानसरिया,सौरभ धोंगडे,स्वरूप धोंगडे,वृषभ काला,दीपक लोहाडे,संकेत जैन आदींची उपस्थिती होती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें