भिडे गुरुजींना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मोर्चा - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 25 मार्च 2018

भिडे गुरुजींना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मोर्चा

भिडे गुरुजींना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मोर्चा.


भिमा-कोरेगाव दंगलीच्या प्रकरणात संभाजी भिडे गुरुजींवर करण्यात आलेले आरोप मागे घ्यावे यासाठी मुंबईत २८ मार्चला ‘भिडे सन्मान मोर्चा’ काढण्यात येणार आहे. भिमा-कोरेगाव दंगलीच्या खऱ्या सुत्रधारांना अटक करण्यात यावी, आणि भिडे गुरुजींवरील आरोप मागे घ्यावे, मिलिंद एकबोटे आणि धनंजय देसाई यांची मुक्तता करावी या प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाची माहिती सांगण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये परिषदेत हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांनी ‘आदरणीय गुरुजींवरी आरोप बिनबुडाचे असून एकही सबळ पुरावा नसताना गुरुजींना अटक करा म्हणणे हा संविधानाचा अपमान आहे. याचा सनदशीर मार्गाने विरोध करण्यात येइल’  असा दावा केला.

शिवप्रतिष्ठान संघटनेच्या मागण्या.....

संभाजी भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठान संघटनेने या मोर्चाच्या  निमित्ताने अन्य काही मागण्याही सरकारकडे केल्या आहेत.

१) पुण्यातील यल्गार परिषदेतील सर्व जातीयवादी वक्त्यांवर कारवाई करावी २) १ जानेवारीच्या दंगलीत हत्या झालेल्या मराठा तरुण राहुल फटांगळेला न्याय मिळावा ३) दि. ३ जानेवारी २०१८ रोजी बंद दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई बंद पुकारण्याऱ्यांकडुनच करावी ४) दंगलीमागे नक्षली हात आहे काय यावर चौकशी समिती नेमावी.

२८ मार्च २०१८ रोजी, सकाळी ठीक ९ वाजता, जिजामाता उद्यान, भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें