आयपीएल आधी वृद्धिमान साहा याचा धमाका, २० चेंडूत शतक.
टीम इंडियाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याने आयपीएल सुरु होण्याआधीच स्फोटक फटकेबाजी केली. कोलकाता मधील एका क्लब सामन्यात खेळताना २० चेंडूत शानदार शतक ठोकले. हे शतक करताना आयपीएलमध्ये काय रणनिती असेल, त्याची चुणूक दाखवून दिलेय. कोलकाता कालीघाट मध्ये जेसी मुखर्जी ट्रॉफी टुर्नामेंट मध्ये मोहन बागान आणि बीएनआर रिक्रिएशन क्लबमध्ये हा सामना झाला.
२० बॉलमध्ये १०२ धावा...
वृद्धिमान साहा हा मोहन बागान टीमकडून खेळत आहे. बुधवारी मोहन बागान विरुद्ध बीएनआर रिक्रिएशन क्लबच्या टीमने ७ बाद १५१ धावा केल्यात. उत्तरादाखल मैदानात उतरलेल्या मोहन बागानकडून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या वृद्धिमान साहाने जोरदार फटकेबाजी केली. साहासोबत शुभोमोय दास यांनेही चांगली फटकेबाजी केली. या जोडीने ७ षटकात १५१ धावा कुटल्यात. वृद्धिमान साहाने केवळ २० बॉलमध्ये १०२ धावा केल्या. या धावांच्या जोरावर संघाने १० गडी राखून विजय मिळवला.
४ चौकार आणि १४ षटकार....
वृद्धिमान साहाने १०२ धावा फटकावताना ४ चौकार आणि १४ षटकार ठोकलेत. त्याने ५१० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्यात. तर शुभोमोय दासने २२ चेंडूत ४३ धावा केल्या. यात त्याने ६ चौकार आणि २ उत्तुग षटकार खेचलत. या दोघांनी ७ षटकात सामना संपवला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें