येवला मतदारसंघातील यात्रास्थळ विकास व मोठ्या ग्रामपंचायत नागरी सुविधांच्या
विकास कामांसाठी ७४ लक्ष रुपये निधी मंजूर
एकही मुस्लिम दर्गाह देवस्थान यांचा समावेश नाही,
📰🗞चोख अहवाल साहेंबा पर्यंत न पोहचले मुळेच मुस्लिम देवस्थांनेंवर अण्याय विकास कामांपासुन वंचित .......
काझी.सलिम.प्रतिनिधी.नाशिक.
येवला शहरातील मुलतानपुरा ,जहागीरदार काॅलणी ,अमीना नगर ,समद पार्क ,मिल्लत नगर ,पोलीस ग्राउंड जवळचा भाग रीझवान मेंबर याचे बगला जवळचा परीसर विकासा पासुन दुर असे अनेक अदी भागात ,रस्ते लाईट, गटार यांचा अभाव ,ईतर भागा प्रमाणे मुस्लिम भागात रस्ते डांबरीकरन न करता पक्के काॅक्रीटी करन करण्यात यावे मुस्लिम भागात भाजप चे नगर अध्यक्ष निधी अनत नाही व न.पा.मतदार संघात राष्ट्रवादीचा गड असलेला मुस्लिम भाग यात आमदार निधीतुन एकही काम चालु बजेट मधे नाहीत ...लोखंडे साहेबांनी याकडे ही लक्ष केंद्रीत करावे ..........काझी सलीम येवला यांची मागणी,नाराज मतरांना राजि करन्यासाठी पायपीट करता तसीच पायपीट मुस्लीम भागातील विकासकामे करण्यासाठी मा.श्री.लोखंडे साहेब यांचेवतीने करण्यात यावी...
तीर्थक्षेत्र व यात्रास्थळ विकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून निफाड तालुक्यातील लासलगाव येथील श्री.शैनेश्वर महाराज मंदिर येथे वाहनतळ बांधकामासाठी १० लक्ष, खडकमाळेगांव येथे श्री.हरीबाबा मंदिर येथे भक्त निवास बांधकामासाठी १० लक्ष रुपये, कोटमगाव येथे श्री.रोकडेश्वर मंदिर येथे वाहनतळ बांधकामासाठी १० लक्ष रुपये तर येवला तालुक्यातील श्री.स्वामी समर्थ मंदिर येथे शौचालय बांधकाम करण्यासाठी ५ लक्ष रुपये असे एकूण ३५ लक्ष रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.
त्याचबरोबर मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान योजनेतून येवला तालुक्यातील राजापूर येथे सोयगाव ते भास्कर जाधव यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटकरण करण्यासाठी ८ लक्ष रुपये, अंदरसूल येथील अंदरसूल-पढेगांव रस्ता काँक्रीटकरण करण्यासाठी ८ लक्ष रुपये, पाटोदा येथील गावांतर्गत रस्ता काँक्रीटकरण करण्यासाठी ८ लक्ष रुपये तर निफाड तालुक्यातील विंचूर येथील औरंगाबाद रोड रायजादे यांचे घर ते डोंगरगाव रोड कांगणे घरापर्यंत रस्ता काँक्रीटकरण करण्यासाठी८ लक्ष रुपये, विंचूर येथील कृष्ण मंदिर समोरील जागेत अभ्यासिका बांधणे ७ लक्ष रुपये असा एकूण ३९ रुपये निधीस जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी मिळाली आहे.
येवला मतदार संघात तीर्थक्षेत्र व यात्रास्थळ विकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना व मोठ्या ग्रामपंचायतींना नगरी सुविधांसाठी विशेष अनुदान योजनेतून झालेल्या एकूण ९ विकास कामांसाठी ७० लक्ष रुपये निधीस जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आला आहे. या सर्व कामांना लवकरच सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें