पार्डीच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला मा.गटशिक्षणाधिकारी नरवाडे साहेबांचा जीवनपन
मा.गटशिक्षणाधिकारी यांच्या आकस्मिक भेटीने समोर आले विद्यार्थ्यांचे भावविश्व
वर्ग 6 वी च्या विध्यार्थ्यांना 2000 रुपयांचे विशेष पारितोषिक
समशेर खान.प्रतिनिधी.सेलु.
आज दि 12 मार्च 2018 रोजी जि प प्रा.शाळा पारडी येथे मा.गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे साहेब यांनी आकस्मित भेट दिली. त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला .पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष गुणवत्ता पहिली .
विशेष म्हणजे मा.नरवाडे सरांनी प्रत्येक वर्गातील बालकाला जवळ घेऊन विविध प्रश्न विचारून संवाद साधला .
क्रमिक पुस्तकाच्या बाहेर जाऊन मुलांना काय जमतं व मूळ कशी व्यक्त होतात हे त्यांनी अनुभवलं. मुलांच्या भाव भावना संबंधात अनेक प्रश्न विचारून मुलाचा विचार पट जाणून घेतला.
*वर्ग सहावीच्या विध्यार्थ्यांना दिले 2000 रु चे विशेष पारितोषिक*💐💐
वर्ग सहावीच्या वर्गात साहेबांनी प्रवेश करताच सर्व चिमुकल्यानीही अतिशय आनंदाने स्वागत केलं आणि नेहमी प्रमाणे मुक्त सवांद चालू केला .मा.नरवाडे साहेबांनी मुलांना अनेक प्रश्न विचारून मुलांची बौद्धिक ,भावनिक तपासणी केली . विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी तत्परते दिलं याच
विशेष कौतूक त्यांनी केलं .
काजल ,मनीषा आदींनी वर्गात व शाळेत चालणाऱ्या विविध उपक्रमावर माहिती सादर केली . तर *अजय ने लिहिलेल्या पत्रावर साहेबांनी बोलताना विशेष अभिनंदन केलं.*
*पेनमित्र उपक्रम हा तुमचा खूप प्रेरणा देणारा व मानवी मनाला उभारी देणारा उपक्रम आहे असं ते म्हणाले* . मी त्या उपकर्मांत तुमच्या सोबत आहे याचा मला आनंद झाला.
मुलांनी साहेबांना काही भावस्पर्शी प्रश्न विचारले
*काजल -मा.सर आपण गटशक्षणाधिकारी या पदावर कसे पोहचला?*
साहेब - या पदावर मी अतिशय संघर्ष करत करत पोहचलो.हे सांगताना साहेबांनी आपलं बालपण , विध्यार्थी जीवन , व सध्यस्थीत व्यक्त केली .हे जाणून घेताना मा.सरपंच, smc अध्यक्ष ,व गावातील काही शिक्षणप्रेमी खूप प्रभावित झाले.
स्वतः चे उदा.देत देत खुओ प्रेरणा देण्याचं काम त्यांनी सहजपणे केलं .मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास निर्माण झालेला दिसला.
*राधा च्या आई व वडील या विषयावर बोलणं ऐकून तर मा.नरवाडे साहेबांचे डोळेच पाणावले.व राधाने विशेष कौतुक करत करत आपसूक खिशातून 2000 रुपये काडून वर्ग सहावीच्या मुलांना त्यांनी पारितोषिक म्हणून भेट दिले* .व त्यांनी मुलांना प्रेरणादायी आवाहनही केलं की, *बाळांनो शिक्षण हेच परिवर्तन घडविण्याचे प्रमुख साधन आहे तुम्ही हे साधन आपल्या स्वतः मध्ये इतकं छान रुजवात आहेत हे असंच कायम राहू द्या .खूप शिका मोठं व्हा . .*
*हे सर्व घडताना वर्गाचे वर्ग शिक्षक युवराज माने मात्र आज या आनंदापासून दूर होते*
*याची खंत मात्र त्यांना जीवनभर राहीलच*
आभार मानत मानत साहेबांनी मुलांना शब्द दिला की, मी पुन्हा येणार व दिवसभर तुमच्यासोबत राहणार .मला तुम्हाला भेटून , बोलून खूप आनंद झाला .आज पर्यंत मी इतका आनंदी कधीच झाला नव्हतो .
*शेवटी साहेबांनी आमच्या मुलांसोबत स्वतः आणलेली शिदोरी चा मनसोक्त गप्पा मारत आस्वाद घेतला हे तितकंच विशेष!!!!*💐
गावचे मा.माउली राठोड, अमोल आढे, अनिल लघें ,सुभाष लंघे ,आदी गावकरी हे सर्व घडत असताना प्रत्यक्षदर्शी होण्याचा आनंद घेत होते .त्यांनी शेवटी साहेबांचे खूप खूप आभार मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें