ढेंगळी पिंपळगाव येथे महिलादिन उत्साहात साजरा
सेलू / प्रतिनिधीजि. प.प्रा .शा. ढेंगळी पिंपळगाव येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणुन सरपंच सौ सुशीलाबाई सोळंके ,उपसरपंच सौ सावित्राबाई सोळंके ,ग्रामपंचायत सदस्या सौ कौशल्याबाई मगर ह्या उपस्थित होत्या. अध्यक्षस्थान जेष्ठ शिक्षिका सौ जयश्री बलांडे यांनी भुषविले.कार्यक्रमास शालेय समितीतील सर्व महिला सदस्या ही आवर्जून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ शरयु कुलकर्णी यांनी केले.मुलींचे शिक्षण व संस्कार याविषयी प्रास्ताविकात मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिलांसाठी विविध मनोरंजक व आनंददायी स्पर्धा घेऊन विजयी महिलांना बक्षीस देण्यात आले .सूत्रसंचालन सौ प्रणिता डिगे ,आभार सौ माधवी कौसडीकर यांनी केले. कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें