शहर विकासासाठी तब्बल ४१ कोटी रूपयांची प्रथमच मोठी तरतूद-जिजाबाई राठोड - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 5 मार्च 2018

शहर विकासासाठी तब्बल ४१ कोटी रूपयांची प्रथमच मोठी तरतूद-जिजाबाई राठोड

शहर विकासासाठी तब्बल ४१ कोटी रूपयांची प्रथमच मोठी तरतूद-जिजाबाई राठोड


सोनपेठ (राजेश खेडकर) सोनपेठ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. जिजाबाई चंद्रकांत राठोड यांच्या अध्यक्षतेखाली २८ फेब्रुवारी रोजी नगरपरिषदेची विशेष सभा संपन्न झाली, या सभेत कोणतीही करवाढ नसलेले व शहर विकासावर प्रथमच  ४१ कोटी रूपयांची भरीव तरतूद केलेले, ९ लाख ९ हजार १६१ रूपयांचे   शिलकीचे अंदाज पञक मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी नगराध्यक्षा जिजाबाई राठोड यांनी दिली.

   नागरीकांना दिलासा देणारे व शहर विकासासाठी तब्बल ४१ कोटी १९ लाख ९७ रूपयाचा निधी प्रस्तावित केलेले साल सन २०१८ -१९ वर्षाचे अंदाज पञक बुधवारी नगराध्यक्षा जिजाबाई राठोड यांनी सभाग्रहात सादर केले. या अंदाज पञकात न.प. चे अंदाजीत उत्पन्न ४५ कोटी ३९ लाख ३० हजार २१५ रूपये दर्शविण्यात आले आहे, तर आर्थिकद्रष्ट्या दुर्बल घटकांसाठी ३ लाख ६ हजार ५१३, महिला बालकल्याणासाठी ३ लाख ६ हजार ५ १३, अपंगासाठी ३ लाख ६७ हजार ८१६ रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंदाज पञकात शहर विकासावर भर देण्यात आला आहे.
या विशेष सभेला मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, उपनगराध्यक्ष दत्तराव कदम, गट नेते चंद्रकांत राठोड, विरोधी पक्ष गटनेत्या सौ. सारिका भोसले, सर्व नगर सेवक, लेखापाल छगन मिसाळ , कार्यालयीन प्रमुख नागनाथ कोटूळे आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें