*माझा वाढदिवस याउपक्रमांतर्गत जि.प.प्राथमिक शाळेत ग्रंथदानाची परंपरा*
*चि. आदम इसाक सय्यद याने दिली पुस्तकांची भेट*
सोनपेठ(राजेश खेडकर)
तालूक्यातील जि.प.प्रा.शा.विटा(खु.) या शाळेत परंपरे नुसार आज इयत्ता तिसरीतील विद्यार्थी चि. आदम इसाक सय्यद ह्याचा वाढदिवस शाळेच्या ग्रंथालयास पुस्तके भेट देऊन साजरा करण्यात अाला. सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्या प्रेरणेतुन विद्यार्थी त्यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेला पुस्तके भेट देण्याची परंपरा मागील चार ते पांच वर्षापासुन राबवित असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक शेख यांनी सांगितले. आज चि. आदम इसाक सय्यद यानेही शालेय ग्रंथालयास पुस्तके भेट दिली.
यावेळी शाळेच्या वतीने विद्यार्थी प्रतिनिधी चि. सोहेल पठाण व विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. संध्या भोसले हिने, तसेच मुख्याध्यापक शेख, सहशिक्षक सर्वश्री भिसे, बनाळे, शालेय व्यवस्थापन समिती विटा(खु) व सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्यावतीने चि. आदम इसाक सय्यद यास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें