शिक्षक भारती संघटनेचे पुरस्कार जाहीर
>ग्रंथपाल विलास सोनार यांचा समावेश.
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२८मार्च २०१८
महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी व
शिक्षणाच्या हक्कासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील शिक्षक भारती ह्या एकमेव शासन मान्य संघटनेची शिक्षण क्षेत्रातील समस्यांची सोडवणुक करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन म्हणुन व त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन सन्मानित करण्याची परंपरा आहे. यावर्षी नासिक विभागातून पुरूषोत्तम इंग्लिश स्कूलचे ग्रंथपाल विलास सोनार यांची गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून शिफारस केली होती; प्रस्तावास आमदार कपिल पाटील व निवड समितिने मान्यता दिली होती.
त्यानुसार येत्या ३० मार्च रोजी एश्वर्या मंगल कार्यालय मालेगाव येथे आयोजित शिक्षक भारतीच्या मेळाव्यात श्री.विलास सोनार यांना आमदार कपिल पाटील ह्यांचे हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य के. के.अहिरे यांनी कळविले आहे.
विलास सोनार सारख्या ग्रंथपाल व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रवंबित मागण्याविषयी शासन दरबारी सतत पाठपुरावा व लढा देनाऱ्या ग्रंथपालास हा सन्मान मिळणे म्हणजे त्यांच्या कार्याचा व महाराष्ट्रातील दुर्लक्षीत असलेल्या समस्त ग्रंथपाल बंधु भगिनींचा सन्मान आहे असे ग्रंथपाल संघटनेकडून बोलल्या जात आहे.
या सन्मानाबद्दल ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठचे अध्यक्ष तथा श्री महालिंगेश्वर विद्यालय सोनपेठ (जि.परभणी) ग्रंथपाल राजेश खेडकर व महात्मा फुले विद्यालय परभणीचे ग्रंथपाल मधुकर रेंगे पाटील यांनी ग्रंथपाल विलास सोनार यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें