जिंतूर व सेलू तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यासाठी पाणी टंचाई साठी निधी कमी पडू देणार नाही= ना. बबनराव लोणीकर... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 23 मार्च 2018

जिंतूर व सेलू तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यासाठी पाणी टंचाई साठी निधी कमी पडू देणार नाही= ना. बबनराव लोणीकर...

जिंतूर व सेलू तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यासाठी पाणी टंचाई साठी निधी कमी पडू देणार नाही= ना. बबनराव लोणीकर...


 समशेर खान
विशेष,प्रतिनिधी.
आज दि. 23 रोजी विधान सभेमध्ये आ. अजितदादा पवार, आ. विजय भांबळे यांनी विचारलेल्या लक्षवेधी वर खुलासा करताना पाणी पुरवठा मंत्री *ना. श्री. बबनराव लोणीकर यांनी परभणी जिल्ह्याला पाणी टंचाई साठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे सांगितले* आ. विजय भांबळे यांनी परभणी जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदार संघामध्ये जिंतूर व सेलु तालुक्यामध्ये टंचाई आराखडा तयार केला असुन त्यास जिल्हाधिकारी, परभणी मंजुरी देत नसल्याचे सभागृहा पुढे मांडले.  या लक्षवेधीवर माहिती देताना मा. लोणीकर यांनी सभागृहास माहिती दिली परभणी जिल्ह्याचा पाणी टंचाई आराखडा जानेवारी 2018 मध्ये विभागीय आयुक्तांनी मंजुर केला आहे. जिंतुर तालुक्यासाठी 838 उपाययोजनां पैकी 32 उपाय योजनांना मान्यता देण्यात आली आहे.  तर *सेलु तालुक्या मधील 288 उपाययोजनांपैकी 37 उपाययोजनांना मान्यता देण्यात आली आहे*.  यापुढे श्री. लोणीकर यांनी सांगितले की केवळ जिंतुर व सेलू तालुक्या सह परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना टंचाई साठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल.  पिण्याच्या पाण्यासाठी शासन कोणत्याही उपाययोना करताना निधीची कमतरता जाणवू देणार नाही. या शिवाय परभणी जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजना मधुन 23 योजनांना मंजुरी देण्यात आली असुन त्या साठी रू. 21 कोटी 35 लाख एवढा निधी देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत मागील 3 वर्षात 176 गावे/वाड्या च्या 155 पाणी पुरवठा योजना पुर्ण करण्यात आल्या आहेत.  त्यासाठी रू. 60 कोटी 70 लक्ष एवढा निधी खर्च करण्यात आलेला आहे.  त्यामुळे सन 2017-18 मध्ये टंचाई साठी परभणी जिल्ह्याला आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल अशी माहिती मा. लोणीकरांनी सभागृहाला दिली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें