सोनपेठ येथे शहीद दिन साजरा - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 23 मार्च 2018

सोनपेठ येथे शहीद दिन साजरा

सोनपेठ येथे शहीद दिन साजरा

वृत्तपत्र विक्रेता संघटनेने केले ग्रंथदान


सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२३मार्च २०१८
वृत्तपत्र वितरक हा प्रसार माध्यमातील महत्वाचा घटक असुनही शासन दरबारी दुर्लक्षीत आहे असे मत परभणी जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष अंबादास वाकोडे(खेडकर) यांनी व्यक्त केले. येथील तालूका वृत्तपत्र विक्रेता संघटना व जि.प.प्रशाळेच्या संयुक्त विद्यमाने शहीद दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रशाळेच्या सावित्रीबाई फुले सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेचे पुजन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशाळेचे मुख्याध्यापक सुमीत लांडे हे होते तर, मानिकअप्पा निलंगे, अंबादास वाकोडे (खेडकर) व कोषाध्यक्ष हेमंत मुथा, शिवाजीराव मव्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटित कामगार म्हणुन मान्यता दिली आहे; मात्र स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेते कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणीही वाकोडे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. तर मानिकराव निलंगे यांनी समाजसुधारक व क्रांतिकारकाचे चरित्र वाचन करण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. राजेश्वर खेडकर, संदिप लष्करे, शिवाजी कुंभारीकर तसेच प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त व्यक्त केले.
उपस्थितांच्या हस्ते जि.प. प्रशाळा सोनपेठ व तालूक्यातील शाळांना देन्यासाठी सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीस  ग्रंथदान करण्यात आले.
कार्यक्रमास सोनपेठ तालूका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर पोटे, उपाध्यक्ष माधव जगताप, मानिक हजारे, पत्रकार किरण स्वामी, राधेश्याम वर्मा, शिवाजी कुंभारीकर, सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर, ज्येष्ठ शिक्षक सुधाकर कदम, संदिप लष्करे, सहशिक्षीका श्रीमती रोडे, रविकुमार स्वामी आदींची उपस्थिती होती. शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थिनी कु. संध्या सुर्यवंशी व प्रज्ञा गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय पोपळे या विद्यार्थ्याने केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें