शेतकऱ्यांचे पीक कर्ज परस्पर उचलले म्हणून सेलुत गुन्हा दाखल
+वालुर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रकरण
+एक लाख 42 हजार रूपयांचा अपहार
सेलु:प्रतिनिधी
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वालुर शाखेतून शेतकऱ्यांचे पीक कर्ज परस्पर उचलून पैशांचा अपहार केला म्हणून सात जणांच्या विरोधात सेलु पोलीस ठाण्यात मंगळवार 27 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे .
प्रकरणासंदर्भात अधिक माहिती अशी की परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वालुर येथे 12 सप्टेंबर.2016 ते दिनांक 27डिसेंबर2016 या कालावधीमध्ये सात जणांनी संगणमत करून शेतकऱ्यांचे पीक कर्ज परस्पर उचलून पैशांचा अपहार केला होता सदरील प्रकरणात सहकारी संस्था(कापुस)परभणी परीक्षक वर्ग दोन
प्रवीण ईजाते यांनी सेलु पोलीस ठाण्यात मंगळवार 27 फेब्रुवारी रोजी तक्रार दिल्यावरून 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे .सदरील तक्रारीत नमूद केल्यावरून 12 सप्टेंबर 2016 ते 27 डिसेंबर 2016 या कालावधीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वालुर शाखेत 1लाख 42हजार 235 रुपये 22 शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर उचलून पैशांचा अपहार केला म्हणून सेलु पोलीस ठाण्यात गु.र.न.45/2018 कलम 420,406,34 भांदवी नुसार सेवा सहकारी सोसायटीचे दत्ता सिताराम खरबे (चेअरमन) राधाकिशन श्रीरंग रोकडे पंच (संचालक) मुंजाजी सिद्राम आष्टकर (संचालक) विलास कनीराम राठोड (संस्था सचिव), देविदास कुंडलिकराव इप्पर (बातमी बँक शाखा अधिकारी), जगन्नाथ रामराव डोंबे
(बँक निरीक्षक,) महाभारत माधवराव भोंडवे( रोखपाल )सर्व राहणार परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वालुर आदी.सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे हे करत आहे.

Nice
जवाब देंहटाएं