मराठीसाठी स्कूल ऑफ महाराष्ट्र स्थापन व्हावे - माणिक पुरी - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 1 मार्च 2018

मराठीसाठी स्कूल ऑफ महाराष्ट्र स्थापन व्हावे - माणिक पुरी

मराठीसाठी स्कूल ऑफ महाराष्ट्र स्थापन व्हावे - माणिक पुरी 

सेलू : येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय आणि शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमात ( मंगळवार  ता. २७  रोजी )  माणिक पुरी म्हणाले की, रोममधील व्हेक्टीकन म्युझियममध्ये जसे महत्त्वाच्या पाश्चिमात्य लेखक,तत्वज्ञांना सामावून घेणारे प्रेरणादायी  स्कूल ऑफ अथेन्स आहे त्याच धर्तीवर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी योगदान देणाय्रा व्यक्तीमत्वांना सामावून घेणारे स्कूल ऑफ महाराष्ट्र स्थापन व्हावे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानोबा बोराडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माणिक पुरी,बालनाट्य लेखक ञ्यंबक वडसकर, सर्जेराव लहाने हे होते.या प्रसंगी काशिनाथ पल्लेवाड,अनुराधा कानडे,महादेव आगजाळ यांची उपस्थिती होती.
   पुढे बोलतांना माणिक पुरी म्हणाले की, आद्यकवी मुकुंदराजांपासून आतापर्यंतचा मराठी भाषा,साहित्याचा प्रवास हा वैभव संपन्न राहिलेला आहे. आता मराठी भाषेच्या अधिक विकासासाठी गरज आहे ती इतर भाषेतील साहित्य मराठीत येण्याची आणि मराठी भाषेतील साहित्य इतर भाषेत अनुवादीत होण्याची. बालनाट्य लेखक ञ्यंबक वडसकर यांनी, कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांचा जीवनपट उलगडून दाखवला.सोबतच कोलंबसाचे गौरव गीत ही कविता आणि नटसम्राट नाटकातील कविता सादर केली. या कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी प्रतिक्षा काळे व सानिका देऊळगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सुमिता सबनिस, अश्विनी कुलकर्णी यांनी समयोचित कविता सादर केल्या. मराठी राजभाषा दिना निमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व,हस्ताक्षर,निबंध स्पर्धेतील उत्तेजनार्थ,प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या गणेश फासाटे,सर्जेराव भुमरे,आकाश जायभाय,अॅड.अक्षय प्रधान, विश्वनाथ बोराडे,अॅड.हर्षवर्धन सोनकांबळे, जयंत नाईक या स्पर्धकांना या कार्यक्रमात सन्मानपञ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश हिवाळे यांनी,सुञसंचालन शरद ठाकर यांनी तर आभार प्रदर्शन दिगंबर रोकडे यांनी केले.

फोटो ओळी

सेलू: येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात आयोजित मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमात बोलताना माणिक पुरी मंचावर ज्ञानोबा बोराडे,सर्जेराव लहाने,ञ्यंबक वडसकर,सुरेश हिवाळे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें