विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती अध्यक्षपदी महादु कदम .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२९: मानवत येथील शाहु नगर येथे भा.रि.प जिल्हा नेतृत्व धम्मपाल सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव समितीची बैठक काल दि.२८ मार्चरोजी शाहुनगर येथे पार पडली या बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी महादु गंगाराम कदम , तर उपाध्यक्षपदी अशोक नामदेवराव पंडित ,सचिवपदी राम उर्फ लखन तुपसमुंद्रे ,सहसचिवपदी गंडले सर , कोषाध्यक्ष यु.डी.सरोदे , मुख्य संघटक अशोकराव लाटे अशी कार्यकारणी ची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .या बैठकीसाठी अशोक पंडीत , बापुराव खरात , तुकाराम काकडे , नामदेव अठवले ,सहादुजी खरात ,महेद्र खरात ,मिलिंद खरात , प्रमोद गायकवाड ,बाळु तांबे , सोनकांबळे सर , बोबडे सर ,गोंटेसर लक्ष्मण साळवे , दिलिप भदर्गे ,रमेश साठे, मुंजा डोळसे आदीची निवड करण्यात आली. यावेळी शाहु नगर , जिजाऊ नगर ,एकता नगर ,गोलाईत नगर व आदित्य पार्कप्रमुख पदाधिकारि यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें