भोकरदन शहरात भगवान महावीर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 29 मार्च 2018

भोकरदन शहरात भगवान महावीर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

भोकरदन शहरात भगवान महावीर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

शे.सलिम.
*भोकरदन प्रतिनिधी*:- दि.२९ मार्च रोजी भगवान महावीर जयंती भोकरदन शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी ९ वाजता जैन मंदिर येथे ध्वजारोहण करण्यात आले त्या नंतर भोकरदन शहरातील महात्मा फुले चौक,रोकडा हनुमान मंदिर चौक,सराफा मार्केट, हेडगेवार चौक,आंबेडकर चौक,शिवाजी महाराज चौक, राज कलेक्शन, परत जैन मंदिर या मुख्य मार्गाने भव्य अशी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये भोकरदन शहरातील प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ.मंजुषाताई देशमुख,सौ.निर्मालाताई दानवे,मा.नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख,काँग्रेस तालुका अध्यक्ष त्र्यम्बंक पाबळे, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी,सर्व पक्षाचे नगरसेवक, व भोकरदन शहरातील प्रतिष्टीत नागरिक यांनी भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन केले,यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यानंतर श्री.१००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर येथे अभिषेक करण्यात आले त्यानंतर श्री. राजेंद्रकुमार संजयकुमार विजयकुमार धोंगडे तसेच श्री आशिष पाणसारिया,अतुल पाणसारिया यांच्या तर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला नंतर संध्याकाळी पाळणा व भक्तीगीताचा कार्यक्रम झाला या मिरवणुकी मध्ये इंद्र इंद्रायणी चा मान संजयकुमार सौ. सुनीता धोंगडे यांना मिळाला या मिरवणुकी मध्ये नगरसेवक संतोष अन्नदाते,भारतीय जैन संघटना तालुका अध्यक्ष मयुर बाकलीवाल, ,रोहित बाकलीवाल,संजोश बाकलीवाल, मयुर आंबेकर,डॉ. आकाश पांडे,राकेश पानसरिया,अमित खुळे,स्वप्निल पांडे,गौरव जैन,सौरभ धोंगडे,स्वरूप धोंगडे,सागर पांडे,अमित लोहाडे यांनी परिश्रम घेतले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें