जि प प्रा शाळा पारडीतील विद्यार्थ्यांची सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी -मराठी ग्रंथाल्यास भेट - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 29 मार्च 2018

जि प प्रा शाळा पारडीतील विद्यार्थ्यांची सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी -मराठी ग्रंथाल्यास भेट

जि प प्रा शाळा पारडीतील विद्यार्थ्यांची सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ  हिंदी -मराठी ग्रंथाल्यास  भेट

ग्रंथपाल महादेव आगजाळ  यांच्याकडून  विद्यार्थ्यांनी जाणून घेतला ग्रथांलयाचा कारभार

समशेर खान.
 सेलू तालुक्यातील  ग्रामीण भागातील जि प प्रा शाळा पारडी येथील विद्यार्थ्यांनी  स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथाल्यास भेट दिली . या प्रसंगी  ग्रंथालयाचे *ग्रंथपाल मा.आगजाळ यांनी मुलांचे अतिशय प्रेमपूर्वक स्वागत केले .प्रथम त्यांनी मुलांना    ग्रंथालयातील दर्शनी भाग व त्यावरील  महत्वाचं वाटणार काय हे तुम्ही निरीक्षण करा अशी सूचना केली .त्यानंतर त्यांनी मुलांना  ग्रंथयातील  पुस्तकं हाताळण्यास सांगितलं .त्याप्रमाणे मुलांनी अतिशय शांतपणे सर्व ग्रंथालय छोटया छोटया डोळ्यांनी टिपलं. नंतर जेव्हा ग्रंथ  हाताळण्यास सांगितलं तेव्हा तर जणू काही दिवाळीच आली की काय असं वाटलं ! यापूर्वी कधीच येवढे पुस्तके त्यांनी पाहिली नव्हती.त्यामुळे मुलं आधाश्यासारखी पुस्तके पाहू लागले. जो तो पुस्तक हातात घेऊन पाहू लागला .एकमेकांना जणू ते विसरूनच गेली की काय असंच वाटत होतं. कोणी पुस्तकाचं मुखपृष्ठ तर कोणी चित्र , तर कोणी पुस्तकांचे आकार पहात होते . तर कोणी पुस्तकासीच गप्पा मारण्यात दंग होते*
अशाप्रकारे
          *पुस्तकांच्या दुनियेत रममाण झालेल्या फुलपाखरांना पाहून मन अगदी आनंदानं चिंब चिंब झाल्यासारखं वाटत होतं, आज माझ्या चिमुकल्याना स्वर्गाहून जास्त काहीतरी मिळाल्या सारखं वाटत होतं*

नंतर ग्रंथपालां नी मुलांना एकत्रित बोलवून विविध माहिती दिली. सोबतच मुलांच्या मनांतील कुतूहल रुपी प्रश्नांना समर्पक अशी उत्तरही दिली .
 *पुस्तक कसं हाताळावे, असे हाताळल्याने काय फायदे होतात हे ही उत्तमपणे समजावून दिले*

*ग्रंथांचे क्रमांक कसे दिले जातात , नेमकं पुस्तकं कसं शोधलं जात , कोणत्या पुस्तकानं अधिक मागणी असते अश्या अनेक महत्त्वाच्या बाबीवर त्यांनी मार्गदर्शन केलं .*

*ग्रंथालयाचे  कामकाज व ग्रंथालयाचे महत्व समजावून दिलं*

*ग्रंथालयाचे शहरातील स्थान विषद करताना त्यांनी सेलू शहराची यशोगाथाही सांगितली*

*ग्रथांचे महत्व अगदी सोप्या भाषेत मुलांना स्पष्ट करून दिल*
 
     याप्रसंगी मुलांनी अनेक प्रश्न विचारले ,व काही मुलाणी पुस्तकाचे महत्व , वाचनाचे फायदे ,आदी विषयावर माहिती सादर केली .हे पाहून मा.आगजल यांनी मुलाचे खूप खूप कौतुक केलं

शेवटी राधा शेळके व काजल राठोड यांनी ग्रंथालय कर्मचारी व ग्रंथपालांचे आभार मानले.

याप्रसंगी पारडी गावचे सरपंच माउली राठोड, smc अध्यक्ष अमोल आढे, मधुकर आढे  व शिक्षक युवराज माने  उपस्थित होते .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें