योगजीवन ग्रंथ व शिवप्रतिमा भेट देऊन निवडीच्या शुभेच्छा - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 1 मार्च 2018

योगजीवन ग्रंथ व शिवप्रतिमा भेट देऊन निवडीच्या शुभेच्छा

योगजीवन ग्रंथ व शिवप्रतिमा भेट देऊन निवडीच्या शुभेच्छा


सोनपेठ (राजेश खेडकर)
येथील सा.सोनपेठ दर्शनचे संपादक श्रीयुत किरन स्वामी यांची परभणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकिय सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल जयभवानी मित्रमंडळाच्यावतीने त्यांचा नुकताच शिवप्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळ सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर यांनीही श्री. स्वामी यांना "योगजीवन" अर्थात योगाभ्यासाने निरोगी व्हा! निर्भय जगा!! आकर्षक दिसा!!! हा ग्रंथ भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. राधेश्यामजी वर्मा यांच्या निवास स्थानी झालेल्या या कार्यक्रमास जय भवानी मित्र मंडळाचे  अध्यक्ष बळीराम काटे, ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर, मराठी पत्रकार परीषदेचे अध्यक्ष बाबासाहेब गर्जे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा सोनपेठ चे सदस्य तथा पत्रकार राधेशाम वर्मा, ग्रंथ वाचन चळवळीचे सदस्य तथा  पत्रकार  मंजुर मुल्ला, जय भवानी मित्र मंडळाचे मावळे मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें