संसाराच्या अंगी अवघीस वेसने - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 3 मार्च 2018

संसाराच्या अंगी अवघीस वेसने

*संसाराच्या अंगी अवघीस वेसने* 

*आम्ही या किर्तने शुद्ध झालो -ह, भ, प, नामदेव महाराज चारठाणकर*


सेलू -दि 3 /3 शनिवार रोजी तालुक्यातील देवला पुनर्वसन येथील जगत गुरू तुकाराम महाराज बिज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह मध्ये विष्णुदास नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यांचे काल्याचे किर्तन सेवा संपन्न,

सात दिवस चाललेल्या या देवला पुनर्वसन येथील अखंड हरिनाम सप्ताह मध्ये तुकाराम महाराज वैकुण्ठ गमन व श्रीमद भागवत कथा सोहळ्याचे  हे अकरावे वर्ष होते.
या भागवत कथेचे निरूपन  ह, भ, प, शिवाजी महाराज खवणे यांच्या अमृत वाणी तुन कथन करण्यात आले,
या कार्यक्रमात सात दिवस  महाराष्ट्रातील नामवंत  किर्तन कार यांचे किर्तन झाले हरिपाठ, हरि जागर, गाथा भजन,  अन्नदान झाले

तुकाराम महाराज वैकुण्ठ गमन निमित्त ठिक बारा वाजता तुकाराम महाराज यांच्या जय घोशात पुष्प वृष्टि करण्यात आली. व
  श्रीमद भागवत कथेची सांगता नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यांच्या काल्याच्या किर्तन सेवेने झाली ,
या किर्तनास गायन साथ संगत राम महाराज वाघ, रामेश्वर महाराज पवार, मारोती महाराज वाघ, माऊली महाराज खवणे, नीलकंठ महाराज काष्टे,  मृदंग रामेश्वर महाराज कव्हळे  ,कार्तिक महाराज हिंगणे ,
या वेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले,
या किर्तनास पंचक्रोशितील भक्त व सेलू, वाकी सातोना येथील वारकरी मंडळी उपस्थित होती,

या अखंड हरिनाम सप्ताह चे व सात दिवसीय कार्यक्रमाचे नेतृत्व श्री ह, प, भ, शिवाजी दादा खवणे,
श्री, ह प भ बापुसाहेब महाराज खवणे, सर्व ग्रामस्त देवला पुनर्वसन व सातोना पुनर्वसन  सेलू शिवशंभो मित्र मंडळ देवला पुनर्वसन सेलू

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें