भोकरदन येथे भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपन्न - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 3 मार्च 2018

भोकरदन येथे भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपन्न

भोकरदन येथे भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपन्न 


शे.सलिम.
भोकरदन  (प्रतिनिधी ) दि . 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संपूर्ण राज्यभरात दलित तरूण व नागरिकांवर दाखल करण्यात  आलेले गुन्हे मागे घेणे तसेच दंगलीस जबाबदार  असलेले मिलिंद  एकबोटे व संभाजी भिडे यांना तात्काळ  अटक करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी भोकरदन येथील तहसील कार्यालयासमोर दि . 3 मार्च रोजी तालुकाध्यक्ष प्रदीप जोगदंडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, तहसीलदार कार्यालया मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भीमा कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरातील दलित तरूण व नागरिकांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात  आलेले आहेत. निरपराध दलित तरुणावर गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांचे भावी आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन सदर चे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत व दलित तरूणांना व नागरिकांना दिलासा द्यावा तसेच दंगलीस कारणीभूत असलेले मिलिंद  एकबोटे व संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करावी. तसेच भीमा कोरेगाव येथे अभिवादनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची वाहने फोडण्यात आली तसेच जाळण्यात  आली आहेत.तया सर्वांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच महागाई निर्देशांक नुसार भारत सरकार शिष्यवृत्ती ची उत्पन्ना नुसार सरसकट मर्यादा वार्षिक रूपये पाच लाख करावी व ती सर्व प्रवर्गास लागू करावी तसेच विद्यार्थ्यां चा निर्वाह भत्ता दरमहा पंधराशे रूपये करण्यात यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
निवेदनावर भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप जोगदंडे, शहराध्यक्ष विशाल मिसाळ, युवा तालुकाध्यक्ष रमण पगारे, गौतम पगारे, स्वप्नील पालवे, स्वप्नील दाभाडे, मुकेश शिंदे, मुकेश बिरारे , सागर साळवे, सुशील राऊत, प्रकाश शेजूळ , शेख शाकेर , बाळासाहेब पगारे, संदीप मगरे, अमोल पगारे, सागर पगारे, पवन पगारे, दिपक वेलदोडे, दुरगादास मगरे, गौतम पगारे, अभय बिरारे, प्रदीप  आरके , निलेश जाधव,  अमोल पानपाटील , शुभम पगारे, किरण वाघमारे,  अजय दाभाडे, दिपक बिरारे, रोहन पगारे, मिलिंद  अंभोरे, रोहन पगारे, मिलिंद  अंभोरे, अभिजित गायकवाड, सत्यशिल वाघ,  अक्षय गायकवाड  आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें