सर्वसामान्‍य नागरिकांना प्रधानमंत्री बेटी बचाव बेटी पढाव योजनेच्‍या आडुन आर्थिक लुट थांबविन्यात यावी :नगरसेवक अ. कदिर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 3 मार्च 2018

सर्वसामान्‍य नागरिकांना प्रधानमंत्री बेटी बचाव बेटी पढाव योजनेच्‍या आडुन आर्थिक लुट थांबविन्यात यावी :नगरसेवक अ. कदिर

सर्वसामान्‍य नागरिकांना प्रधानमंत्री बेटी बचाव बेटी पढाव  योजनेच्‍या आडुन आर्थिक लुट थांबविन्यात यावी :नगरसेवक अ. कदिर

शे.सलिम.
  भोकरदन प्रतिनिधी(शेख सलीम): मागील काही दिवसापासुन भोकरदन शहर व ग्रामीण भागातील सर्वसामान्‍य नागरिकांची प्रधानमंत्री बेटी बचाव बेटी पढाव  योजनेच्‍या आडुन आर्थिक लुट होत असुन ती त्‍वरीत थांबविण्‍यात यावी शहरासह तालुक्‍यातील अनेक गावात केंद्रशासनाच्‍या महीला व बालविकास विभागामार्फत बेटी बचाव बेटी पढाव या योजनेच्‍या नांवाने राज्‍यातील लाखो गरीब लोकाना गंडा घातल्‍याचा प्रकार यापुर्वीच उघडीस आलयानंतर महिला व बालविकास मंत्रालयाने अशी कोणती घोषणा सरकारकडुन करण्‍यात आली नाही असे स्‍पष्‍ट केलेले असताना सुध्‍दा भोकरदन शहरातील काही झेरॉक्‍स दुकानदार या योजनेचे अर्ज सामान्‍या नागरीकाना विकुन त्‍यांची फसवणुक करीत आहे.
     बेटी बचाव बेटी पढाव योजनेअंतर्गत अर्ज भरून घेतले जात असुन, सोबत सदर मुलीच्‍या आधार कार्ड,बॅक पासबुक इत्‍यादी महत्‍तवपुर्ण कागदपत्रांची झेरॉक्‍स प्रत, फोटो आदी घेउन हे अर्ज भरल्‍या जात आहे. यासाठी प्रतयेकी 50 ते 100 रूपये फी आकारली जात आहे. अर्ज भरल्‍यानंतर मुलीच्‍या लग्नाच्‍या वेळी दोन लाख रूपये मिळणार असलयाची अफवा पसरविण्‍यात आल्‍याने गोरगरीब यास बळी पडत असुन, खातरजमा न करता अर्ज भरून देण्‍यासह महत्‍तवाच्‍या कागदपत्रांच्‍या झेरॉक्‍सप्रती आर्जासोबत दिल्‍या जात आहे. खरेच दोन लाख रू मिळणार असतील तर 50 ते 100 रूपयांसाठी कशाला अधिक चौकशी करायची या भावनेतुन हा अर्ज भरून देयासाठी काही सुशिक्षित नागरिक देखील मागचा-पुढचा काही विचार न करता अर्ज भरून देत आहेत. या अर्जासोबत आधार कार्डची झेरॉक्‍स प्रत व बॅकखत्‍याची इत्‍यभुत माहीती देण्‍यात येत असल्‍याने कदाचित या माहीतीचा भविष्‍यात गैरवापर होण्‍याची शक्‍यता नाकरता येत नाही या करिता  योजनेच्‍या नावाखाली सर्वसामान्‍य जनतेची होणारी फसवणुक वेळीच थां‍बविण्‍यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अ. कदिर(बापु) यांनी निवेदनाद्वारे केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें