जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र चे पुणर्गठण
सोनपेठ येथील युवा पत्रकार राधेश्याम वर्मा यांची निवड
सोनपेठ(राजेश खेडकर)सबंध महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या हितासाठी कामगार कायद्याखाली काम करणाऱ्या *"जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र"* (जेयुएम) या पत्रकार संघटनेची *सन २०१७ ते २०१९* या कार्यकाळासाठी राज्य कार्यकारणीची निवड करण्यात आली. नारायण पांचाळ हे राज्य संघटनेचे अध्यक्ष असुन, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यतील कांही पत्रकारांचा यात समावेश असतो. नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणी पुनर्गठनात परभणी जिल्ह्यातील दोन पत्रकार राज्य परिषद सदस्य/जिल्हा प्रतिनिधी निवडल्या गेले आहेत. यात सोनपेठ येथील युवा पत्रकार राधेश्याम वर्मा यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल राधेश्याम वर्मा यांचे सोनपेठ तालूका मराठी पत्रकार संघ, ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठ, मित्रमंडळ व हितचिंतकांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें