मानवत पंचायतसमीती कार्यालयाला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 17 मार्च 2018

मानवत पंचायतसमीती कार्यालयाला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे .


मानवत पंचायतसमीती कार्यालयाला शेतकऱ्यांनी ठोकले  टाळे .

मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.17: मानवत येथील पंचायत समिती येथे  दि.१६ मार्च रोजी दुपारी १ वाजता पाणी टंचाई आढावा बैठक अतिरिक्त जिल्हाधिकारी आण्णासाहेब शिंदे ,व पाथरी चे उपजिल्हाधिकारी एस .एस .कोकणी व मानवत चे  तहसिलदार नकुल वाघुंडे  यांच्या प्रमुख उपस्थीतीत  बैठक सुरू आसताना आंबेगाव येथिल रो.ह.यो.अंतर्गत सिंचन विहिरी संदर्भात ग्रामसेवक भोसले यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा व  सिंचन विहीर मजुर करण्यात याव्या या मागणी साठी  शेतकऱ्यांनी अचानक पंचायत समितीला  कुलूप ठोकुन दिडतास आंदोलन केले त्यामुळे प्रशासनाची चांगलीच ताराबळ उडाली .
आंबेगाव येथील शेतकऱ्यांनी विहिर सिंचनाच्या प्रस्ताव दाखल केले होते परंतु  ग्रामसेवक भोसले हे जाणीवपूर्वक सह्या खोटे असल्याचे पंचायतसमीतीस कळवुन शेतकऱ्यांना वेठिस धरत होते. मागिल दोन तिन दिवसाखाली आंबेगावच्या शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात  पेट्रोल अंगावर घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न  केला होता त्यांवेळी गटविकास अधिकारि यांनी दोन अधिकारी मार्फत  चौकशी समिती नेमली होती यात  ए.पि.ओ. एस .एस.हरने व विस्तार अधिकारी एस.व्हि. पानपाटिल यांच्या मार्फत चौकशी करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती .परंतु ग्रामसेवक वर लवकरात लवकर कारवाई करुन विहिर सिंचनाचे प्रस्ताव मान्य करावे या मागणीसाठी  आंबेगाव येथिल महिला व पुरुष  शेतकऱ्यांनी आज पाणी टंचाई तालुका अढावा बैठकीच्या वेळी अचानक पंचायत समितीला कुलुप ठोकुन  आंदोलन केले.  आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अतिरिक्त जिल्हाअधिकारी आण्णासाहेब शिंदे यांनी तोंडी आश्वासन दिल्यानंतर आंदोलककारी शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.यावेळी बाजार समीतीचे उपसभापती पंकज आंबेगावकर , कालिंदा कारभारी जाधव, तुकाराम नागोराव जाधव, अर्जून किसनराव जाधव, शांताबाई आत्माराम जाधव, कोंडाबाई बाबुराव जाधव, रामचंद्र जाधव या शेतकऱ्यांनी पंचायत समितीला टाळे ठोकुन आंदोलन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें