महावितरण कंपणीस सोनपेठ येथील तरूणांचा निर्वाणीचा ईशारा
कारभार सुधारा नसता परिणामास तयार रहा!
सोनपेठ(राजेश खेडकर)सोनपेठ शहर तसेच तालुक्यात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा निषेध करत तरुणांनी दिला इशारा एका निवेदनातून तहसील कार्यालय मंडळ अधिकारी विठ्ठल पिंपळे व महावितरणचे उप अभियंता कैलास फड यांना इशारा देण्यात आला की, महावितरणच्या विद्युत बिलात अनंत चुका करणे, अव्वाच्या सव्वा बिल देने, त्याबाबतच्या तक्रारींची सोडवणूक नकरता विज पुरवठा खंडित करण्यापुर्वी १५दिवसाची नोटिस नदेता विज पुरावठा खंडित करत वसुली कर्मचारी हिटलरासारखे वागत असुन तात्काळ बिल भरा, तुमच्या वरती गुन्हे दाखल करु अशा धमकी देऊन ग्राहकांना वेठिस धरत आहेत. महावितरण ची सेवा ही शहरात काय तालुक्यात सुध्दा अनेक अनंत तक्रारी असुन तक्रार निवारण करन्यासाठी कर्मचारी संख्या वाढवा व शहरात मध्यवर्ती ठिकाणी केंद्र उभारा तसेच १२ विवीध मागण्या केलेल्या आहेत या १५दिवसात मान्य न केल्यास आपल्या वसुली पथकास शहरात व तालुक्यात कोठेहि फिरु देनार नाहित याची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल असा इशारा दिला आहे.यावेळी उप आभियंता कैलास फड बोलतांना दुरुस्ती अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे खोळबली आहे परंतु वसुली वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या आदेशानुसार चालु आहे,यावेळी सर्व तरुनांणी आमचे निवेदन वरिष्ठांना पाठऊन मार्ग काढावा तुम्ही सहकार्य करा आम्हि सहकार्य करतो.यावेळी ब्राह्यण गल्लीत व राज गल्लीत डिम व्होल्टेज ची अडचन नगर परीषदेने जागा देताच नविण डि.पी.बसुन देनार असल्याचे सागीतले.या निवेदनाच्या प्रति मा.सह व्यवस्थापक संचालक, प्रादेशिक महावितरण कार्यालय, औरंगाबाद, मा.मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण कंपणी परभणी, मा.अधिक्षक अभियंता, परभणी आदिंना दिले आहे.निवेदनावर बळीराम काटे, नारायन रोडे, आकाश चव्हाण, शेख फैरोज, जावेद शेख, साजेद कुरेशी,मोहन काटे आदि प्रमुखाच्या सह आडुसष्ठ ६८तरुणांच्या स्वाक्षरी आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें