मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सोनपेठ तालुक्यातील कान्हेगावची अविष्काला मिळाले जीवदान - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 13 मार्च 2018

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सोनपेठ तालुक्यातील कान्हेगावची अविष्काला मिळाले जीवदान

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सोनपेठ तालुक्यातील कान्हेगावची अविष्काला मिळाले जीवदान


सोनपेठ(राजेश खेडकर)

तालुक्यातील कान्हेगाव येथील अविष्का वचिष्ट भंडारे या तीन वर्षाच्या मुलीला द्वीदलीय ह्रदय आजार या गंभीर आजाराला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत सुमारे दोन लाख एक्कावन्न हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.
बऱ्याच दिवसांपासून अविष्का ची प्रकृती खालावत जात होती डॉक्टकडे गेले असता डॉक्टरने त्याचा खर्च सुमारे अडिच लाख रुपये सांगितला कुटुंब सामान्य व भूमीहीन असल्याने एवढे पैसे कुठून आणायचे हाच त्यांच्यापुढे मोठा प्रश्न पडला होता. यातच तालुक्यातील कवी महेश कोरडे यांच्या सहकार्याने त्यांनी मुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांची भेट घेउन आपली व्यथा मांडली. त्यावर ओमप्रकाश शेटे यांनी मुंबईतील एस.आर.सी.सी चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे मुलीच्या उपचारासाठी संबंधिताना त्वरित सूचना दिल्या व उपचारासाठी पूर्णपणे मदत करण्याचे सांगितले.
६ मार्च ला अविष्काचे ऑपरेशन व्यवस्थितपणे पार पडले  व १२ मार्च ला अविष्काला हॉस्पिटलमधून घरी परत सोडण्यात आले. घरामध्ये पैशाची तारांबळ असताना मा. मुख्यमंत्री व ओमप्रकाश शेटे यांनी देवासारखी मदत केल्याबद्दल भंडारे कुटूंबातील सदस्य त्यांचे आभार व्यक्त करत आहेत .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें