दिव्‍यांगासाठी राखीव ठेवण्यात आलेला 3% निधी भोकरदन नगरपरिषद हद्दीतील अपंगासाठी खर्च करावा :अब्दुल कदिर   - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 22 मार्च 2018

 दिव्‍यांगासाठी राखीव ठेवण्यात आलेला 3% निधी भोकरदन नगरपरिषद हद्दीतील अपंगासाठी खर्च करावा :अब्दुल कदिर  

 दिव्‍यांगासाठी राखीव ठेवण्यात आलेला  3% निधी भोकरदन नगरपरिषद हद्दीतील अपंगासाठी खर्च  करावा :अब्दुल कदिर 

शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : दिव्यांगासाठी राखीव निधी खर्च करण्यासाठी नगरसेवक अब्दुल कदिर यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन अपंग नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या तीन टक्के निधी भोकरदन नगरपरिषद हद्दीतील अपंगासाठी खर्च करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली. मुख्‍याधिकारी यांना  देण्‍यात आलेल्‍या निवेदनामध्‍ये सांगितलं की, शासनाने अपंग नागरिकांच्‍या कल्‍याणासाठी अपंग नागरिकांसाठी समान संधी संरक्षण व समान सहभाग कायदा लागु केला आहे. सदर कायदयातील कलम 40 अन्‍वये सर्व नागरी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांनी अपंगासाठी किमान 3% निधी राखीव ठेवण्‍याबाबत शासन निर्णय झालेले आहे. सदर निधीचा भोकरदन शहरातील अपंगाच्‍या कल्‍याणसाठी खर्च करण्‍याकरिता भोकरदन नगर परिषदेच्‍या दिः22/12/2017 रोजी च्‍या सर्वसाधारण सभे मधिल ठराव क्र 4 असुन सदर निधी खर्च करण्‍यासाठी सर्वानुमते मंजुर करण्‍यात आले असुन, तरी देखील आता पर्यंत सदर निधी खर्च करण्‍यात आलेला नाही. तरी चालू आर्थिक वर्षात अपंग नागरीकांना त्‍यांचा हक्‍क देण्‍यात यावा.तसेच या निधीमधुन खालील प्रमाणे दिव्‍यांग नागरिकांना सुविधा उपलब्‍ध करून द्यावे व त्यांचा उदरनिर्वाह ,व्‍यवसाय,साहित्‍य, खरेदी करण्‍याकरिता निधी थेट लाभार्थ्‍याच्‍या खात्‍यात जमा करावा.अंपग शालेय शिक्षण खेळाडुकरिता शिष्‍यवृत्‍ती देण्‍यात यावी.  स्‍थानिक बसस्टॅण्ड मध्‍ये व्‍हिल चेअर उपलबध करून देणे

 अपंगाना पेंशन योजना सुरू करणे तरी मे साहेबांनी सदर निधी लवकरात लवकर खर्च करावा.नसता लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन छेडण्‍यात येईल व याची सर्वस्‍व जबाबदारी आपली राहील अशी मागणी निवेदनात करण्यात आली.या निवेदनाच्या प्रति मा.प्रधान सचिव, नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई. मा. प्रधान सचिव सामाजिक न्‍याय, व विशेष सहाय विभाग मुंबई मा. आयुक्‍त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचनालय, वरळी, मुंबई.
मा विभागीय आयुक्‍त,विभागीय आयुक्‍त कार्यालय औरंगाबाद,

मा. जिल्‍हाधिकारी, जिल्‍हाधिकारी कार्यालय जालना मा. उपविभागीय अधिकारी. उपविभागीय आधिकारी कार्यालय भोकरदन मा. तहसिलदार, तहसिल कार्यालय, भोकरदन यांना पाठवण्यात आल्या. व भोकरदन नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक वामन आडे यांना निवेदन देतांना नगरसेवक अब्दुल कदिर,अपंग संघटनेचे पदाधिकारी बाबुराव पगारे,रफिक खान पठाण,सामाजिक कार्यकर्ते मुंमताज मदनी, दीपक तळेकर,पाशु भाई आदि उपस्थित होते.



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें