दीड लाखाच्यावर भाविकांनी घेतला लाभ
हिंदु समाज बांधवांनी ही दिला मदतीचा हात
लिंबेजळगाव इज्तेमा हुन परत येणार्या भाविकांसाठी आडुळ येथे करण्यात आले होते महाप्रसादाचे आयोजन
शे.मुनाफ पटेल.प्रतिनिधि.आडुळ.
लिंबेजळगाव ता. औरंगाबाद येथील राज्य स्तरीय तब्लीगी इज्तेमासाठी राज्यासह
देश व विदेशातुन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. हा इज्तेमा 24,25 व 26 रोजी पार पडला. इज्तेमासाठी भाविक 22 फेब्रुवारी पासुनच इज्तेमागाह कडे जात होते. त्यामुळे आडुळ ता. पैठण येथील मुस्लिम बांधवाच्या वतीने इज्तेमासाठी जाणारया भाविकासाठी 25 तारखेपर्यंत चहा, पाणी, नाश्ता व फराडाची सोय करण्यात आली. तर 26 तारखेच्या मुख्य दुआ नंतर मंगळवारी संध्याकाळी सहा पर्यंत जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. येथे तब्बल *सत्तर हजाराच्यावर* भाविकांनी जेवणाचा लाभ घेतला.
येथील *जेष्ठनागरीक श्री. रुस्तुमराव पाटील वाघ*(माजी व्हाईस चेअरमन संत एकनाथ सहकारी साखर कारखाना) यांनी 122 टॅक्टरच्या टाक्या भरुन व पन्नास हजार लिटर (फिल्टर पाणी) मोफत दिले. *अभिषेक कारंजकर यांनी पण फिल्टर पाण्याचे जार मोफत उपलब्ध करुन दिले होते.*
येथील *माजी पंचायत समिती सदस्य विजय पाटील वाघ, तुकाराम अंतरकर व येथील ख्रिच्चन समाजास बांधवांनी* या
कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करुन दिली होती. दिनेश साऊंड सर्विसचे मालक
*शांतीलाल राठोड* यांनी भव्य मंडपाची व्यवस्था केली होती.यासाठी येथील इतर समाज बांधवांनी ही विविध प्रकारे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदत करुन सहकार्य केले. सलग सात दिवस चाललेल्या या महाप्रसादाच्या कार्यक्रमात जवळपास दिड लाखाच्या वर भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
आडुळ बु., आडुळ खु., ब्राम्हणगाव, बालानगर, पारुंडी, एकतुनी, रजापुर, पांढरी, काद्राबाद येथील मुस्लिम बांधव व बघिणी यांनी परिश्रम घेतले. पाचोड पोलिस ठाण्याचे *सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे* यांनी येथे पोलिस मदत केंद्र सुरू करुन वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें