पुण्यात चोरट्याने पोलिसांलाच गंडवलं 80 हजाराची हातचलाखी
प्रतिनिधि.पु्णे : पुणे : लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचा-याला पैसे काढताना मदत करण्याचा बहाणा करुन चोरट्याने त्यांच्याकडील ए.टी.एम.कार्ड बदली करून परस्पर ८० हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.मोहमद अझरुद्दीन महागामी (वय२३, रा़ सोलापूर) असे त्याचे नाव आहे़ याप्रकरणी पोलीस नाईक श्री. अशोक किसन सातव यांनी फिर्याद दिली होती़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, श्री.अशोक सातव हे पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील एका ए.टी.एम.वर पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांना पैसे न निघाल्याने एकाने त्यांना मदत करण्याचा बहाणा करून पिन क्रमांक विचारला व त्यांना पैसे काढून देत असल्याचा बहाणा करून त्यांचे ए.टी.एम. कार्ड बदलून त्यांना दुसरे ए.टी.एम.कार्ड दिले. काही वेळाने दुस-या ए.टी.एम.वरून त्याने ८० हजार रुपये काढून घेतले. श्री.सातव यांना मोबाईलवर तसा संदेश आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली़या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी परिसरातील ए.टी.एम. सेंटरमधील फुटेजवरून आरोपीचा फोटो मिळविला. त्याचा शोध सुरू केला, त्या वेळी आरोपी ढोले पाटील रोडवर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोहमद महागामी याला पकडले. त्याच्याकडून श्री.सातव यांचे ८० हजार रुपये हस्तगत केले, त्याने अशाप्रकारे आणखी दोन गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून, एकूण ३ गुन्ह्यांमधील ९० हजार रुपये त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ़ श्री.प्रभाकर बुधवंत, अपर पोलीस अधीक्षक श्री. तुषार पाटील, उपविभागीय अधिकारी श्री. नंदकुमार घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मनोज खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री.हिंमत माने पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री.अनिल पासंगे, पोलीस हवालदार श्री. सुरेश जाधव, पोलीस शिपाई श्री. नीलेश बिडकर, श्री.अनिल जुंदरे,श्री. संजीव हासे,श्री. सिद्धार्थ वाघमारे यांनी केली.
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें